
वैभव सूर्यवंशी याने 2025 वर्ष गाजवलं. वैभवने कमी वयात अनुभवी फलंदाजांना लाजवेल अशी कामगिरी करुन दाखवली. आता नववर्ष सुरु झालंय. वैभवच्या निशाण्यावर मोठा विक्रम आहे. (Photo Credit: PTI)

वैभव 2026 या वर्षातील पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. वैभव मैदानात उतरताच ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. शनिवारी 3 जानेवारीपासून अंडर 19 इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. (Photo Credit: PTI)

वैभव सूर्यवंशी या मालिकेत आयुष म्हात्रे याच्या अनुपस्थितीत अंडर 19 टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. वैभव पहिल्या सामन्यात टॉससाठी मैदानात येताच अंडर 19 संघाचा सर्वात युवा कर्णधार ठरेल. आयुषला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. (Photo Credit: PTI)

क्रोएशियाच्या झॅक वुकुसिक (Zach Vukusic) हा क्रिकेट विश्वातील सर्वात युवा कर्णधार आहे. झॅकने वयाच्या 17 वर्ष 311 व्या दिवशी टी 20i सामन्यात सायप्रस विरुद्ध नेतृत्व केलं होतं. आता वैभव शनिवारी झॅकचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढेल. (Photo Credit: PTI)

अंडर 19 टीम इंडिया वैभवच्या नेतृत्वात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. उभयसंघात 3 ते 7 जानेवारी दरम्यान या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. (Photo Credit: PTI)