
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2025-2026 या हंगामात अनेक फलंदाज चमकदार कामगिरी करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे देवदत्त पडीक्कल. कर्नाटकाच्या या युवा फलंदाजांना झंझावात कायम राखत आणखी एक शतक झळकावलं आहे. (Photo Credit: KSCA)

देवदत्तने त्रिपुरा विरुद्ध खणखणीत शतक झळकावलं. देवदत्तने 120 चेंडूत 108 धावा केल्या. देवदत्तने या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार लगावले. (Photo: Instagram)

देवदत्तचं हे या मोसमातील चौथं शतक ठरलं. विशेष म्हणजे देवदत्तचं हे या मोसमातील पाचव्या सामन्यातील चौथं शतक होतं. देवदत्तचा 22 ही निच्चांकी धावसंख्या ठरली. तर त्याआधी 147,124 आणि 113 अशा धावा केल्या आहेत. देवदत्तने लिस्ट ए कारकीर्दीत 83 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. (Photo: Maharaja Trophy)

देवदत्तने न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा करणाऱ्याच दिवशीच (3 जानेवारी) शतक केलंय. मात्र त्यानंतरही देवदत्तला बीसीसीआयकडून न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळणं अवघड आहे. (Photo: PTI)

टीम इंडियात आधीच सलामीसाठी अनेक फलंदाज आहेत. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल हे त्रिकुट सलामीसाठी आहेत. त्यामुळे तिघे असताना देवदत्तला संधी मिळणं अशक्य आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. (Photo: PTI)