
टीम इंडियाच्या खेळाडूंमागे दुखापतीचं ग्रहण लागलंय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात श्रेयस अय्यर याला दुखापत झाली. त्यानंतर शुबमन गिल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 वेळा दुखापत झाली. त्यानंतर आता टीम इंडियाच्या आणखी एका फलंदाजाला दुखापत झाली आहे. या भारतीय खेळाडूला बरगड्यात दुखापत झाली आहे. (Photo Credit: PTI)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, साई सुदर्शन याला बरगड्यांना दुखापत झालीय. त्यामुळे साईला काही आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, साईला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेदरम्यान ही दुखापत झाली. (Photo Credit: PTI)

साईने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील त्याच्या अखेरच्या सामन्यात मध्यप्रदेश विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. साईला या सामन्यादरम्यान धावताना बरगड्यात त्रास जाणवू लागला. साईला काही दिवसांआधी सरावादरम्यान बरगड्यात बॉल लागला होता. (Photo Credit: PTI)

साई त्यानंतरही खेळत होता. मात्र आता साईला त्रास जाणवत आहे. अशात साई आता बीसीसीआयच्या बंगळुरुतील सीओईमध्ये आहेत. साईवर बीसीसीआयचं वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. (Photo Credit: PTI)

साई भारताच्या वनडे किंवा टी 20 टीमचा भाग नाही. त्यामुळे साईला कोणत्या सामन्याला मुकावं लागणार नाही. मात्र साई आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमापर्यंत दुखापतीवर मात करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit: PTI)