IPL : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा 600 धावा करणारे फलंदाज, विराट कोहली कितव्या स्थानी?

Virat Kohli IPL 2026 : विराट कोहली याने मंगळवारी 26 मे रोजी 43 धावा करुन आरसीबीला निर्णायक सामन्यात चांगली सुरुवात करुन दिली. विराटने या खेळीसह मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

Sanjay patil | Updated on: May 27, 2026 | 4:46 PM
1 / 5
आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध 43 धावा केल्या. विराटने या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. (PHOTO CREDIT- PTI)

आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध 43 धावा केल्या. विराटने या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5

विराटने या खेळीसह आयपीएलच्या 19 व्या मोसमात 600 धावा पूर्ण केल्या. विराटने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराट स्पर्धेत सर्वाधिक वेळा 600 आणि त्यापेक्षा धावा करणारा फलंदाज ठरला. विराटची ही 600 धावा करण्याची सहावी वेळ ठरली. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5

विराटने याआधी 2013, 2016, 2023, 2024 आणि 2025 सालीही 600 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. तसेच विराट सलग 4 हंगामांमध्ये 600 धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5

विराटनंतर या यादीत केएल राहुल दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. केएलने 4 वेगवेगळ्या हंगामात 600 धावा करण्याची कामगिरी केलीय. तसेच केएलची 19 व्या मोसमात 600 धावांची संधी अवघ्या 7 रन्सने हुकली. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5

तसेच ख्रिस गेल, डेव्हीड वॉर्नर आणि शुबमन गिल या तिघांनी प्रत्येकी 3-3 वेळा 600 धावांचा आकडा गाठला आहे. तर साई सुदर्शन, सूर्यकुमार यादव आणि फाफ डु प्लेसीस या तिघांनी प्रत्येकी 2-2 वेळा 600 पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us