
भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून दहाव्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत असा एकमेव कर्णधार आहे ज्याने आपल्या संघाला 2 टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत. तो कर्णधार कोण आहे? हे जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

पहिल्यावहिल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे 2007 साली दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं होतं. भारताने या पहिल्याच स्पर्धेत धमाका करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केली होती. धोनी टी 20i वर्ल्ड कप जिंकणारा पहिला कर्णधार होता. (Photo Credit: Getty Images)

पाकिस्तान 2009 साली झालेल्या दुसर्याच टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत युनूस खान याच्या नेतृत्वात चॅम्पियन ठरली होती. पॉल कॉलिंगवुड याने त्याच्या नेतृत्वात 2010 साली इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. त्यानंतर श्रीलंकेने लसिथ मलिंगा याच्या कॅप्टन्सीत 2014 साली टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. (Photo Credit: Getty Images)

डॅरेन सॅमी 2 टी 20i वर्ल्ड कप जिंकवणारा एकमेव कर्णधार आहे. सॅमीने त्याच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजला 2012 आणि 2016 साली वर्ल्ड चॅम्पियन केलं होतं. आता डॅरेन सॅमी वेस्ट इंडिजच्या कोचिंग टीमचा भाग आहे. त्यामुळे यंदा सॅमी विंडीजला मैदानाबाहेरुन पहिल्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा चॅम्पियन करण्यासाठी सज्ज आहे. अशात सॅमीच्या नेतृत्वात विंडीज टीम कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo Credit: Getty Images)

धोनीनंतर रोहित शर्मा भारताला टी 20i वर्ल्ड कप जिंकून देणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला होता. रोहितने 2024 साली भारताला वर्ल्ड चॅम्पियन केलं होतं. त्याआधी 2022 साली जोस बटलर याने इंग्लंडला त्याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप विजेता संघ हा बहुमान मिळवून दिला होता. तर ऑस्ट्रेलियाने 2021 साली एरॉन फिंच याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची किमया साधली होती. (Photo Credit: Getty Images)