Photo : MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, पुण्यात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर, पोलिसांचा सौम्य लाठीमार
राज्य सरकारनं MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय घेतल्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन

- राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 14 मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतला आहे. तसं परिपत्रक आयोगानं काढलं आहे. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या निर्णयामुळे पुण्यात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
- सरकारनं MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही वेळातच शेकडो विद्यार्थी पुण्यातील शास्त्री रोडवर जमले. त्यावेळी विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला.
- त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आंदोलनस्थळी दाखल झाले. पडळकर यांनी विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकूण घेतलं आणि आंदोलनात सहभागी झाले. रस्त्यावर झोपून सरकार परीक्षा घेण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण हटणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
- ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी वर्षानुवर्षे या परीक्षेची तयारी करतात. पुण्यासारख्या ठिकाणी मोठं आर्थिक नुकसान सहन करत ते परीक्षेची तयारी करत असतात. मात्र, अवघ्या दोन दिवसांवर परीक्षा आली असताना सरकार कुठलीही पूर्वकल्पना न देता परीक्षा रद्द करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सरकार आमच्या भविष्याशी का खेळत आहेत? असा सवालही विद्यार्थ्यांनी विचारला आहे.




