
रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट जोरदार चर्चेत असून करण जोहर याचा हा चित्रपट बिग बजेटचा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी रणवीर सिंह याने तब्बल 25 कोटी रूपये फिस घेतली आहे.

रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये आलिया भट्ट ही देखील मुख्य भूमिकेत असून आलिया भट्ट हिने या चित्रपटासाठी तब्बल 10 कोटी रूपये फिस घेतली आहे.

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र हे देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटासाठी धर्मेंद्र यांनी 1 कोटी रूपये फिस घेतल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटासाठी जया बच्चन यांनी 1 कोटी रूपये फिस घेतली आहे. बऱ्याच वर्षांनंतर जया बच्चन या चित्रपटामध्ये पुनरागमन करताना दिसणार आहे.

शबाना आजमी देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटासाठी शबाना आजमीने 1 कोटी रूपये फिस घेतली आहे. करण जोहर याच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.