
पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. एकूण तीन टप्प्यांत ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पाठवली जाते.

या योजनेअंतर्गत दिला जाणार 2000 रुपयांचा याआधीचा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आला होता. आता शेतकरी 22 व्या हप्त्याची वाट पाहात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना लवकरच ही मदत मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

परंतु फेब्रुवारीचा महिना संपलेला असला तरीही अद्याप ही रक्कम सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. आता मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा होळीच्या अगोदर तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये टाकले जाणार का? असे विचारले जात आहे.

दरम्यान आता येत्या 1 मार्च रोजीदेखील शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत. कारण 1 मार्च रोजी रविवार आहे. या दिवशी बँका बंद असतात. होळीच्या अगोदरही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्याची शक्यता फारच कमी आहे. 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे. त्यामुळे या दिवशीदेखील देशात अनेक राज्यांत बँका बंद आहेत.

3 मार्चलाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्याची शक्यता खूपच कमी आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे पैसे पाठवले जातात. म्हणूनच आता होळी, धुलिवंदनाच्या दिवशीही शेतकऱ्यांना 2000 रुपयांची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.