AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात उद्धव ठाकरे-फडवीसांची तोफ धडाडली!

कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याशी काय लढणार? यांच्या कॅप्टननेच माढ्यातून माघार घेतली आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. कोल्हापुरातील तपोवन मैदानात शिवसेना-भाजप युतीची महासभा पार पडली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सेना-भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि […]

कोल्हापुरात उद्धव ठाकरे-फडवीसांची तोफ धडाडली!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याशी काय लढणार? यांच्या कॅप्टननेच माढ्यातून माघार घेतली आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. कोल्हापुरातील तपोवन मैदानात शिवसेना-भाजप युतीची महासभा पार पडली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सेना-भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुफान टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  1. मुंबईत अरबी महासागर, कोल्हापुरात जनसागर – देवेंद्र फडणवीस
  2. भाजप-सेनेची युती केवळ सत्तेकरता नाही, ही विचारांची युती आहे, आम्हाला अभिमान आहे की, आम्ही हिंदुत्त्ववादी आहोत – देवेंद्र फडणवीस
  3. केवळ नावामध्ये राष्ट्रवाद असून चालत नाही, मनात असायला लागतो, आमच्या मनात राष्ट्रवाद आहे – देवेंद्र फडणवीस
  4. हे काय आमच्याशी लढणार, यांच्या कॅप्टननेच माढ्यातून माघारी घेतली – देवेंद्र फडणवीस
  5. देश 56 पक्षांवर चालत नाही, देश चालवण्यासाठी 56 इंचाची छाती लागते – देवेंद्र फडणवीस
  6. काँग्रेस राष्ट्रवादीला चॅलेंज देतो, तुमचे 15 वर्षातील आकडे आणि मी 5 वर्षांचे आकडे आणतो, आम्हीच पश्चिम महाराष्ट्राला सर्वात जास्त पैसे दिले – देवेंद्र फडणवीस
  7. आम्हाला कदाचित ऊसातला कळत नसेल. मात्र, जाणत्या राजाने जेवढे निर्णय ऊस कारखानादारांसाठी घेतले नाहीत, तेवढे निर्णय मोदींच्या सरकारने घेऊन दाखवले. कारण आम्हाला साखरसम्राटांचं भलं करायचं नव्हतं – देवेंद्र फडणवीस
  8. बारामतीच्या पोपटाला सांगोत, आमचे कपडे कुणीच उतरवू शकत नाही – देवेंद्र फडणवीस यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
  9. मोदी सूर्यासारखे, त्याच्याकडे थुंकल्यावर थुंकी आपल्यावर पडते – देवेंद्र फडणवीस
  10. जयंत पाटील म्हणतात, भाजप इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, मग तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे का? – देवेंद्र फडणवीस

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  1. सेना-भाजप युती झाल्याने, काँग्रेस-राष्ट्रवीचे टायर पंक्चर झालेत – उद्धव ठाकरे
  2. आम्हाला सत्ता पाहिजे, मात्र आम्ही खुर्चीचे वेडे नाहीत – उद्धव ठाकरे
  3. आमची सत्ता आल्यानंतर लवकरात लवकर राम मंदिर उभं राहील – उद्धव ठाकरे
  4. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना गिरीश महाजनांची भीती वाटते – उद्धव ठाकरे
  5. देव, देश आणि धर्मासाठी युती – उद्धव ठाकरे
  6. कोल्हापुरात फक्त भगवाच फडकला पाहिजे – उद्धव ठाकरे
  7. विरोधी पक्ष सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत आणि पवारसाहेब सांगत आहेत की, मी सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला दिला आहे. मग पवारसाहेब सांगून टाका की पंतप्रधान पदाचा उमेदवार नरेंद्र मोदीच ठरला आहे – उद्धव ठाकरे
  8. देवेंद्रजी पवारांना भाजपमध्ये घेऊ नका, त्यांची जागा जनतेने दाखवली आहे. – उद्धव ठाकरे
  9. कोल्हापूर हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला – उद्धव ठाकरे
  10. राष्ट्रवादीला मत देणार असाल, तर अजित पवार धरणं कशी भरतात हे आठवा – उद्धव ठाकरे

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.