AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 4 जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार,11 माजी नगरसेवकांच्या हाती धनुष्यबाण

राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक शिवसेनेत येत आहेत, कारण दिलेला शब्द पाळणे आणि जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याचे काम शिवसेना करीत आहे. जनतेचे आशीर्वाद आणि वाढलेल्या बळाच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

या 4 जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार,11 माजी नगरसेवकांच्या हाती धनुष्यबाण
Updated on: Jun 17, 2025 | 10:46 PM
Share

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आणि विकासाचं वारं घेऊन आम्ही पुढे चाललोय. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याचे काम केले. त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबविल्या. या राज्यातील मतदारांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला. त्यामुळे ८० जागा लढवून ६० जागांवर विजय मिळवला. आणि महायुतीने २३२ जागा जिंकून ऐतिहासिक बहुमत मिळवले, असे यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या चार जिल्ह्यात उबाठाला खिंडार पडले आहे.

चंद्रपूर – पुण्याचे उबाठाचे पदाधिकारी शिवसेनेत 

पुणे जिल्हा काँग्रेस प्रदेश सचिव सोनाली मारणे, नगरसेवक राहुल तुपेरे, काँग्रेस शहर सरचिटणीस किरण मारणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल पवार, गिरीश जैवळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती नगर परिषदेतील माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, प्रमोद गेडाम, अनिता गेडाम, राजू सारंगधर, चंद्रकांत खारकर, शोभा पारखी, शीतल गेडाम, प्रतिभा सोनटक्के, आशा निबांळकर आणि प्रदीप वडाळकर या 11 माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. धाराशीवमधील सोमनाथ गुट्टे, आप्पासाहेब बिराजदार, शंकर चव्हाण, नागनाथ कदम, इलाई शेख, शहाजी हाके यांनी  शिवसेनेत प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्याचे उबाठा उपजिल्हाप्रमुख शंकर दर्जी, नगरसेवक गणेश वडनेरे, मनोज बोरसे, राहुल टीभे, गोविंद मोरे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

वरोराचे चार माजी नगरसेवक सामील

वरोरा नगरपरिषदेचे दिनेश यादव, प्रणाली मेश्राम, सुषमा भोयर आणि किशोर टिकले या 4 माजी नगरसेवकांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाआहे. वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघातील सरपंच गोविंद कुळमेथे, सुचिता ठाकरे, उमेश दातारकर, माजी सरपंच विठ्ठल जोगी यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. वरोरा तालुका उबाठा शहरप्रमुख संदीप मेश्राम, उबाठा विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्यामसिंह ठाकूर, उपाध्यक्ष धरमसिंह ठाकूर, राष्ट्रीय संघटक ठाकूर नेमसिंह सिसोदिया, मेवाड एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन सिंघवी यांनी पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्यामसिंह ठाकूर यांची राजस्थान राज्य मुख्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तसे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.

मध्य प्रदेशातील पदाधिकारी सामील

मध्यप्रदेशातील जबलपूरचे उबाठा उपराज्यप्रमुख शैलेंद्र बारी, विदिशा जिल्हा प्रमुख विजेंद्र लोधी, जबलपूर जिल्हा प्रमुख सुजित पटेल, नगर प्रमुख मुकेश सारठे, इंदोरमधील जावेद खान, अभिषेक कालरा, सुरेश गुर्जर, राजीव चतुर्वेदी यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत आयोजित या सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.