AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का, 14 नगरसेवकांचा अतुल भोसलेंना पाठिंबा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना होमपीचवर आणखी एक जबर धक्का बसला आहे. कराड नगरपालिकेच्या 14 नगरसेवकांनी (14 corporator support bjp against prithviraj chavan) पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडत भाजप उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे.

कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का, 14 नगरसेवकांचा अतुल भोसलेंना पाठिंबा
| Edited By: | Updated on: Oct 06, 2019 | 11:04 AM
Share

कराड (सातारा) : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना होमपीचवर आणखी एक जबर धक्का बसला आहे. कराड नगरपालिकेच्या 14 नगरसेवकांनी (14 corporator support bjp against prithviraj chavan) पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडत भाजप उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण (14 corporator support bjp against prithviraj chavan) निवडणूक रिंगणात उतरले आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून कराड नगरपालिकेच्या 14 नगरसेवकांनी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे. या सर्व नगरसेवकांनी भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. 2014 च्या निवडणुकीत राजेंद्रसिंह यादव आणि त्यांचे समर्थक नगरसेवक पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी होते. आता शहराच्या विकासासाठी भाजपसोबत जात असल्याचे त्यांनी जाहीर केले.

राजेंद्रसिंह यादव आणि इतर नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे भाजपाची ताकद वाढली असून विधानसभेला विजय नक्की झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे उमेदवार अतुल भोसलेंनी दिली आहे.

कोण आहेत अतुल भोसले?

डॉ. अतुल भोसले हे कराडचे युवा नेते म्हणून ओळखले जातात. अतुल भोसले हे सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तर स्वत: अतुल भोसले हे कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत.

अतुल भोसले यांनी 2014 मध्ये भाजपकडून कराड दक्षिण मतदारसंघातून, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती.

या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका पाटील उंडाळकर आणि अतुल भोसले अशी तिहेरी लढत होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला, मात्र विलासकाका आणि अतुल भोसले यांनी त्यांची चांगलीच दमछाक केली होती.

पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळी 76 हजार 831 मतं मिळाली होती, तर विलासकाकांना 60 हजार 413 मतं आणि अतुल भोसले यांनी तब्बल 58 हजार 621 मतं मिळवली होती.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.