मुंबईतून तब्बल 16 हजार लीटर अवैध दारु जप्त

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने 15 एप्रिलपर्यंत 16 हजार लीटर अनधिकृत मद्य पदार्थ साठा जप्त केला आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत निवडणूक आयोगाने 142 प्रकरणात सुमारे 16 हजार लीटर अनधिकृत मद्य पदार्थ साठा जप्त केला आहे. याची किंमत सुमारे 18 लाखांपेक्षा अधिक असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले […]

मुंबईतून तब्बल 16 हजार लीटर अवैध दारु जप्त
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने 15 एप्रिलपर्यंत 16 हजार लीटर अनधिकृत मद्य पदार्थ साठा जप्त केला आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत निवडणूक आयोगाने 142 प्रकरणात सुमारे 16 हजार लीटर अनधिकृत मद्य पदार्थ साठा जप्त केला आहे. याची किंमत सुमारे 18 लाखांपेक्षा अधिक असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. या प्रकरणात 128 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख 55 हजार रुपये किंमतीची पाच वाहनही जप्त करण्यात आली आहेत.

गेल्या महिन्यात 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्या दिवसांपासून देशात आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 मार्चपासून मुंबई शहर तसेच उपनगरात निवडणूक आयोगातर्फे धडक कारवाई करण्यात येत आहे. यानुसार 11 मार्च ते 31 मार्च या कालावधीत 93 प्रकरणात तब्बल 9 हजार 924 लीटरचा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत सुमारे 9 लाख 49 हजार 775 रुपये इतकी आहे. या कालावधीत केलेल्या कारवाईत 84 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून 3 वाहनेही जप्त करण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत 1 लाख 95 हजार इतकी आहे. अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे.

त्यानंतर 1 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत 49 प्रकरणात सुमारे 6 हजार 140 लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत सुमारे 8 लाख 53 हजार 769 रुपये इतकी आहे. या कालावधीत केलेल्या कारवाईत 44 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 60 हजार रुपये किंमतीची 2 वाहने जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान 11 मार्चपासून ते 15 एप्रिलपर्यंत 142 प्रकरणात सुमारे 16 हजार 64 लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. याची अंदाजे किंमत सुमारे 18 लाख 3 हजार 544 रुपये आहे. निवडणूक आयोगाने जप्त केलेल्या मद्यसाठ्यामध्ये 618 लीटर हातभट्टीची दारू, 13 हजार 200 लीटर एवढे मद्य निर्मितीसाठी वापरण्यात येणारे ‘वॉश’ रसायन, 524.28 लीटर देशी मद्य, 218.63 लीटर विदेशी मद्य, 251.87 लीटर बीअर, 1 हजार 194 लीटर ताडी आणि 60.2 लीटर इतर प्रकारचे मद्य या पदार्थांचा समावेश आहे. तसेच या कारवाईत 128 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तींकडून 5 वाहनेदेखील जप्त करण्यात आली असून वाहनांची अंदाजे किंमत 2 लाख 55 हजार इतकी आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.