ओपिनियन पोल : मोदींचा करिष्मा कायम, पण एनडीए बहुमतापासून दूर

ओपिनियन पोल : मोदींचा करिष्मा कायम, पण एनडीए बहुमतापासून दूर

मुंबई : VDPAssociates ने मागील 3 वर्षात 28 राज्यात झालेल्या 45 विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालांच्या अभ्यासातून 2019 च्या लोकसभा निवडणुकांचे कल व्यक्त केले आहेत. यामध्ये एनडीए बहुमतापासून दूर राहत असल्याचं चित्र आहे. तर काँग्रेसच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. डीएमके, टीडीपी, जेडीएस, एयूडीएफ, जेएमएम या पक्षांना संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) गृहीत […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई : VDPAssociates ने मागील 3 वर्षात 28 राज्यात झालेल्या 45 विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालांच्या अभ्यासातून 2019 च्या लोकसभा निवडणुकांचे कल व्यक्त केले आहेत. यामध्ये एनडीए बहुमतापासून दूर राहत असल्याचं चित्र आहे. तर काँग्रेसच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. डीएमके, टीडीपी, जेडीएस, एयूडीएफ, जेएमएम या पक्षांना संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) गृहीत धरण्यात आलंय. तर शिवसेनेला एनडीएपासून वेगळे ठेवून अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.

उत्तर भारताचा अंदाज (शिवसेनेशिवाय)

एकूण जागा – 166

एनडीए – 78 (भाजप 76+मित्रपक्ष 2)

यूपीए – 44 (काँग्रेस 41+मित्रपत्र 03)

इतर  –  44

महत्त्वाचे मुद्दे

उत्तर भारतात जोरदार झटका बसण्याचा अंदाज

पूर्वी भाजपने 106 जागा जिंकल्या होत्या

2019 मध्ये  भाजप 78 जागांवरच थांबण्याचा अंदाज

मोदी आणि योगींचा करिश्मा फोल ठरण्याची शक्यता

तथाकथित हिंदूत्ववाद्यांच्या उच्छादाचा फटका बसणार?

पूर्व भारताचा अंदाज (शिवसेनेशिवाय)

एकूण जागा – 117

एनडीए – 57

यूपीए 18

इतर 42

महत्त्वाचे मुद्दे

पूर्व भारतात भाजप-काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर

दोन्ही पक्षांच्या जागा वाढण्याचा अंदाज

भाजपच्या 36 जागा वाढून 57 वर पोहोचण्याची शक्यता

काँग्रेसलाही 2014 च्या तुलनेत 34 जागा जास्त मिळणार

2019 मध्ये  बिहारमध्ये मोदी-नितीश फॉर्म्युला यशस्वी होणार?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना झटका बसण्याचा अंदाज

काँग्रेस आणि ममतांनी हातमिळवणी केल्यास आकडे बदलणार

पश्चिम भारताचा अंदाज (शिवसेनेशिवाय)

एकूण जागा – 103

एनडीए – 62

यूपीए – 33

इतर – 08

ओपिनियन पोलचे ठळक मुद्दे

मोदींच्या होमग्राऊंडवर भाजपच्या जागा घटणार

महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये फटका

शिवसेनेच्या नाराजीमुळे नुकसान होण्याचा अंदाज

युती न झाल्यास भाजपच्या जागा कमी होणार

2014 च्या तुलनेत काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ होणार

दक्षिण आणि उत्तर पूर्व भारताचा अंदाज (शिवसेनेशिवाय)

एकूण जागा – 156

एनडीए – 27

यूपीए – 62

इतर  –  67

महत्त्वाचे मुद्दे

दक्षिण भारतात काँग्रेसला मोठा फायदा होणार

दक्षिणेत भाजपची हाराकिरी कायम राहण्याचा अंदाज

भाजपच्या जागा जैसे थे, तर काँग्रेसला मोठ्ठं यश

उत्तर पूर्व भारतातही भाजपची पिछेहाटचा अंदाज

2019 मध्ये दोन्ही विभागात काँग्रेसला ‘अच्छे दिन’

2019 च्या अंदाजातील महत्वाच्या बाबी

भाजपला जवळपास 77 जागांचं नुकसान होणार

तीन राज्यातील (छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश) विजयानंतरही काँग्रेसची वाट बिकटच

लोकसभा निवडणुकीत 100 चा आकडा पार करणंही काँग्रेससाठी अवघड

नुकसानानंतरही निकालात मोदींचा प्रभाव दिसणार

टीएमसी, डीएमके, बसपा, सपा, एआयडीएमके, वायएसआर काँग्रेस यांसारखे पक्ष किंगमेकर बनू शकतात

2019 मध्ये कोण होणार पंतप्रधान?

एनडीए (शिवसेनेशिवाय) – 224

यूपीए (टीडीपी+जेडीएस+एयूडीएफ) – 157

इतर – 161

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें