AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांसाठी 360 कोटींचा निधी मंजूर, रस्ते चांगले होणार, वाहतूक कोंडीतून सुटका होईल : खा. श्रीकांत शिंदे

कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी एमएमआरडीएने 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिली आहे.

कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांसाठी 360 कोटींचा निधी मंजूर, रस्ते चांगले होणार, वाहतूक कोंडीतून सुटका होईल : खा. श्रीकांत शिंदे
डॉ. श्रीकांत शिंदे (खासदार कल्याण)
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 12:26 PM
Share

कल्याण : कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी एमएमआरडीएने 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिली आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि एकूणच रस्त्यांच्या दुरावस्थेतून निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतून कल्याण-डोंबिवलीकरांची लवकरच सुटका होईल, अशी अपेक्षा खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोलून दाखवली. (360 crore sanctioned for roads in Kalyan Dombivali Says MP Dr Shrikant Shinde)

MMRDA कडून 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर

कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी एमएमआरडीएने 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याआधी देखील डोंबिवली एम.आय.डी.सी. निवासी विभागातील रस्त्याच्या कामासाठीही एकूण 110 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.

अनेक बैठकांनंतर MMRDA चा निधीसाठी हिरवा कंदील

कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे रस्ते विकासासाठी MMRDA ने निधी द्यावा अशी मागणी खासदार  श्रीकांत यांनी केली होती. याबाबत अनेक बैठका झाल्या अखेर MMRDA ने निधीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

वाहतूक कोंडीतून कल्याण डोंबिवलीकरांची लवकरच सुटका होईल

MMRDA च्या निधीमुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती, अस्तित्वातील डीपी रस्त्यांचा विकास, दुपदरीकरणाच्या कामाला वेग येणार आहे. सदर विकासकामे एमएमआरडीए प्रशासन स्वतः करणार आहे. त्यामुळे पावसाळ्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि एकूणच रस्त्यांच्या दुरावस्थेतून आणि निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतून  कल्याण-डोंबिवलीकरांची लवकरच सुटका होईल, अशी अपेक्षा खासदार शिंदे यांनी बोलून दाखवली .

हे ही वाचा :

लसीकरणाअभावी तिसरी लाट रोखणार कशी? खासदार श्रीकांत शिंदेंचा केंद्राला सवाल

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.