लोकसभेच्या 6 व्या टप्प्यात सरासरी 61 टक्के मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या 6 व्या टप्प्यातील मतदान आज संपन्न झाले. 7 राज्यातील एकूण 59 जागांवर सरासरी 61 टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक 80 टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले. या टप्प्यात दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालचा समावेश होता. मतदानादरम्यान आज उत्तर प्रदेशमध्ये काही हिंसक घटना पाहायला मिळाल्या. त्यामुळे त्याचा एकूण मतदानावरही परिणाम …

लोकसभेच्या 6 व्या टप्प्यात सरासरी 61 टक्के मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या 6 व्या टप्प्यातील मतदान आज संपन्न झाले. 7 राज्यातील एकूण 59 जागांवर सरासरी 61 टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक 80 टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले. या टप्प्यात दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालचा समावेश होता.

मतदानादरम्यान आज उत्तर प्रदेशमध्ये काही हिंसक घटना पाहायला मिळाल्या. त्यामुळे त्याचा एकूण मतदानावरही परिणाम झाल्याचे दिसले. उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 53.21 टक्के मतदान झाले. या व्यतिरिक्त पश्चिम बंगालमध्ये 80.16, झारखंडमध्ये 64.46, हरियाणात 62.85, मध्यप्रदेशमध्ये 60.36, बिहारमध्ये 59.29 आणि दिल्लीत 55.61 टक्के मतदान झाले

या टप्प्यात तब्बल 979 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तसेच 10 कोटी 16 लाख मतदारांपैकी 61 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.  निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 1.13 लाखांपेक्षा अधिक मतदान केंद्रे उभारली होती.

दिल्लीमध्ये भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. पूर्व दिल्लीतून भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांचा सामना आपच्या आतिशी मारलेना आणि काँग्रेसचे अरविंदर सिंह लवली यांच्याशी झाला. उत्तर पूर्व दिल्लीतून काँग्रेस नेत्या शीला दीक्षित विरुद्ध भाजपचे मनोज तिवारी मैदानात होते. तसेच उत्तर पूर्व दिल्लीतून भाजपकडून हंसराज हंस, काँग्रेसकडून के. राजेश लिलाठिया आणि आपचे गुग्गन सिंह यांच्यात चुरशीची लढत होती.

उत्तरप्रदेशमधील आझमगढ लोकसभा मतदारसंघातून सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याविरुद्ध भाजपचे दिनेश यादव उर्फ निरहुआ अशी लढत झाली. मध्यप्रदेशातील गुना या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया विरुद्ध भाजप नेते के.पी. यादव अशी लढत पाहायला मिळाली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *