Yogesh Kadam : मी शिवसैनिकच, भाजपमध्ये जाणार नाही, शिंदे गटातील बंडखोर आमदार योगेश कदमांचं ट्विट

'ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका. मी शिवसैनिक!', असा विश्वासही व्यक्त केला आहे.

Yogesh Kadam : मी शिवसैनिकच, भाजपमध्ये जाणार नाही, शिंदे गटातील बंडखोर आमदार योगेश कदमांचं ट्विट
मी शिवसैनिकच, भाजपमध्ये जाणार नाही
Image Credit source: TV9
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 25, 2022 | 1:56 AM

गुवाहाटी : शिवसेनेशी बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झालेले दापोलीचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी ट्विट (Tweet) करत आपण शिवसेना (Shivsena) सोडून भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगितले आहे. ‘सप्रेम जय महाराष्ट्र, मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही. मुळात तशी गरज ही पडणार नाही. रा. काँ. पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल’ असे आमदार योगेश कदम यांनी ट्विट केले आहे. तसेच ‘ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका. मी शिवसैनिक!’, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

बंडखोर आमदारांच्या अडचणीत वाढ ?

बंडखोर आमदार कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. कायद्यानुसार त्यांना विलिनीकरण करावे लागेल. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये सामील व्हावे लागेल. त्यांना आता कळून चुकेल. येत्या चार दिवसात त्यांच्यावर कारवाई करण्याची पावलं विधानसभा अध्यक्ष आता उचलत असल्याचे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी म्हटलंय. यांना अपात्र करावं असं आम्ही पत्र दिले होते. उद्या परवा या सगळ्यांना अपात्रतेची नोटीस जाईल. उपाध्यक्षांना त्यांनी दिलेल्या पत्रावर एकाही आमदारांची स्वाक्षरी नाही. आता त्यांचे परतीचे मार्ग बंद झाले असून भाजपकडे गेल्यास भगव्याला कायमचे मुकावे लागेल, असेही सावंत पुढे म्हणाले.

अपात्र आमदारांना पाच वर्षे निवडणूक बंदी घालण्याची मागणी

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घमासानाबाबत मध्य प्रदेशच्या काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर आवश्यक कारवाईचे निर्देश देण्याची, तसेच अपात्र आमदारांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर जया ठाकूर यांनी आपल्या जुन्या रिट याचिकेत नवा इंटरलोक्युट्री अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर 29 जून रोजी सुनावणी होणार आहे. (A rebel MLA Yogesh Kadam tweeted that he would not join the BJP)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें