Aaditya Thackeray on Eknath Shinde : आमचा राग मुंबईकरांवर काढू नका, स्थगिती सरकार बनू नका, आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

Aaditya Thackeray on Eknath Shinde : माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारला लक्ष्य केलंय. त्यांनी आरे कारशेडवर बोलताना म्हटलंय की, आमचं सरकार मुंबईसाठी काम करत होतं. स्थगिती सरकार बनू नका, असं ठाकरे म्हणालेत.

Aaditya Thackeray on Eknath Shinde : आमचा राग मुंबईकरांवर काढू नका, स्थगिती सरकार बनू नका, आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
आदित्य ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 12:30 PM

मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी आरे कोरशेडवरुन एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. यावरुन पुन्हा एकदा शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध ठाकरे संघर्ष समोर आलाय. यापूर्वी देखील शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर टीका केलीय. त्यानंतर आता माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारला लक्ष्य केलंय. त्यांनी आरे कारशेडवर बोलताना म्हटलंय की, आमचं सरकार मुंबईसाठी काम करत होतं. आम्ही आदिवाशींसाठी आरेमध्ये रस्ते केले नाही. कारण, झाडं तोडल्या जायला नकोत. आम्ही सरकारमध्ये आरे कारशेड कांजूरमार्गला नेत होतो. त्यामुळे साधारणपणे 10 हजार कोटी वाचले असते. राजकारणामुळे हे सगळं होत नाही आहे. हे सरकार आरे तोडण्याची भुमिका का घेत आहे. ते कळत नाही,’ असं म्हणताना आदित्य ठाकरे यांनी टीका केलीय.

केंद्र सरकारवर टीका

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केंद्र सरकारवर देखील टीका केलीय. यावेळी त्यांनी म्हटलंय की, ‘हे केंद्र सरकारला सांगत आहे. मेट्रो लाईनची जागा कारशेडला द्या. येथे दररोज जंगली प्राणी येतात. आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका, असं आम्ही सांगितलंय. पहिलाच निर्णय या सरकारने मुंबईकरांच्या विरोधात घेतला आहे,’ अशीही टीका आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारनंतर राज्य सरकारवर केली आहे.

स्थगिती सरकार-ठाकरे

यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका करताना स्थगिती सरकार असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की, ‘ हे सरकार पण स्थगिती सरकार होणार का, असा सवाल करत ‘ते आमच्यावर टीका करायेच, आज तेच कामांना स्थगिती देत आहेत,’ असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.

शिंदे गटाला सुनावलं

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला सुनावताना म्हटलं की, ‘माझ्यावर खास प्रेम करण्याची त्यांना गरज नाही. अन्यथा त्यांनी आमच्या पाठित खंजीर खूपसला नसता. शिवसेना ही आपली आहे आणि चिन्हही आपलेच आसणार आहे,’ असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.