दिल्लीत अरविंद केजरीवालांचा आमदार फुटला, थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

आम आदमी पक्षाचे विद्यमान आमदार फतेह सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आमदार फतेह सिंह यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दिल्लीत अरविंद केजरीवालांचा आमदार फुटला, थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पुन्हा सत्ता आणण्यासाठी जोर लावला आहे. तर त्याविरोधात भाजप आणि काँग्रेसनेही शड्डू ठोकला आहे. अशा परिस्थितीत आमदारांची फुटाफुटी होताना दिसत आहे. आम आदमी पक्षाचे विद्यमान आमदार फतेह सिंह (AAP MLA Fateh Singh joins NCP) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आमदार फतेह सिंह यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

फतेह सिंह (AAP MLA Fateh Singh joins NCP) यांच्यासह कमांडो सुरिंदर सिंह यांनी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.

या दोघांचेही स्वागत करताना दिल्ली अभी दूर नहीं. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

फतेह सिंह हे गोकुळपूर विधानसभा  मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. मात्र अरविंद केजरीवाल यांनी त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही. आपने 70 उमेदवारांची यादी जाहीर करताना, 15 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं. यामध्ये फतेह सिंह यांचंही नाव आहे. फतेह सिंह यांच्या ऐवजी चौधरी सुरेंद्र कुमार यांना आपने उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे नाराज फतेह सिंह यांनी बंडखोरी करत, राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना गोकुळपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

2015 मधील निकाल

फतेह सिंह गोकुळपूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. 2015 मध्ये ‘आप’कडून लढताना फतेह सिंह यांना 71240 मतं मिळाली होती. त्यांनी भाजपच्या रंजीत सिंह यांचा 31938 मतांनी पराभव केला होता.

Published On - 12:35 pm, Wed, 22 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI