AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकाटेंच्या जिभेला हाड नाही, बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य करा,अन्यथा…काय म्हणाले संभाजीराजे

या पुढच्या काळात आम्ही स्वतःला मातीत गाडून घेऊ, उजनी धरणात जलसमाधी घेऊ आणि तरीरी सरकार बधले नाही तर मुंबईत येऊन मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानात घुसू असा इशारा बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे

कोकाटेंच्या जिभेला हाड नाही, बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य करा,अन्यथा...काय म्हणाले संभाजीराजे
| Updated on: Jun 12, 2025 | 6:32 PM
Share

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी अन्न त्याग आंदोलन सुरु केलंय त्याचा पाच दिवस आहे. बच्चू कडू यांची तब्येत खालावत चालली आहे. आज कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यांनी येथून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी थेट फोन तरुन कानउघाडणी केली. बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य करा नाही तर मी पण इथे उपोषनाला बसतो असा दमच संभाजीराजे यांनी यावेळी दिला.

अमरावतीत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आज संभाजीराजे यांनी उपोषण स्थळी जाऊन बच्चू कडू यांची चौकशी केली. यावेळी त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उपोषणस्थळावरुनच फोन केला आणि त्यांना दोन बोल सुनावले. ते म्हणाले की शेतकरी आपला केंद्रबिंदू आहे.सरकार म्हणते सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे.मग शेतकरी कोण.? बच्चू कडू यांनी ज्या मागण्या केल्या त्या रास्त आहेत. कोकाटेच्या जिभेला हाड नाही.आम्ही कृषीमंत्री कोकाटे सोबत फोनवर बोललो आहोत पण, फोनवर बोलून फायदा नाही.. उपाय योजना करा, मागण्या मान्य करा असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

संभाजीराजे यांचा सरकारला इशारा…

संभाजीराजे म्हणाले की सरकारने निवडणुकीत आश्वासन दिलं ते पूर्ण करावे.सरकारला माझे आवाहन आहे. बच्चू कडूंची तब्बेत खालवल्यास सरकार जबाबदार राहणार,सरकारने लवकर निर्णय घावा,अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार जबाबदार राहील असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

बच्चू कडू आंदोलन अपडेट…

बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. बच्चू कडू यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आता चार मंत्री संवाध साधणार आहेत. यात मंत्री पंकजा मुंडे, जयकुमार रावल,भरत गोगावले,जयकुमार गोरे यांचा समावेश असून कार्यकर्त्यांकडून आंदोलन तीव्र होत असल्याने ते बच्चू कडू यांची समजूत काढणार आहेत.

कार्यकर्त्यांकडून आंदोलन तीव्र

सोलापूरात प्रहार संघटनेने सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा आज प्रयत्न केला. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे पाच दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही याचा निषेध करण्यासाठी प्रहार जनशक्ती संघटना आक्रमक झाली आहे. सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी आज रास्ता रोको केला होता. या रस्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सोलापूरात कार्यकर्ते आक्रमक

सरकार बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेत नाही. शेतकरी तसेच दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यामुळेच सरकारच्या विरोधात आम्ही आक्रमक भूमिका घेतली आहे. या पुढच्या काळात स्वतःला मातीत गाडून घेणार तसेच उजनी धरणात जलसमाधी आंदोलन करणार असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला आहे. बच्चू यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरात आम्ही घुसू असा इशारा यावेळी सोलापूरचे प्रहार जनशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आणि कार्याध्यक्ष खालिद मणियार यांनी दिला आहे.

जालन्यात शोले स्टाईल आंदोलन

जालन्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बच्चू कडू हे गेल्या चार दिवसापासून अमरावती येथील मोझरी येथे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.आज आंदोलनाचा 5 वा दिवस असून बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्याने राज्यभरात त्यांचे समर्थक आणि प्रहार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.राज्यात ठिकठिकाणी याचे पडसाद उमटत असून जालन्यात देखील जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीवर चढले आहेत. इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे. हातामध्ये झेंडे घेऊन या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी केली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.