Vidhan Parishad Election 2022: ते आले… ते भेटले… ते हसले… हस्तांदोलनही केलं; खडसे-महाजनांच्या अचानक भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

Vidhan Parishad Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. तर भाजपने उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. खापरे या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधान भवनात आल्या होत्या.

Vidhan Parishad Election 2022: ते आले... ते भेटले... ते हसले... हस्तांदोलनही केलं; खडसे-महाजनांच्या अचानक भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या
खडसे-महाजनांच्या अचानक भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 3:37 PM

मुंबई: राजकारणी एकमेकांवर कोणत्याही थराला जाऊन टीका करत असले तरी राजकारणात कोणीच कुणाचा शत्रू नसतो. जे काही आरोपप्रत्यारोप होतात ते केवळ राजकीय असतात. राजकारणापुरते मर्यादित असतात. त्यात व्यक्तिगत द्वेष नसतो आणि आकसही नसतो. अनेकदा तर राजकारणी एकमेकांवर एवढी आगपाखड करतात की असं वाटतं आता सगळं संपलं. पण पुढच्याच क्षणी हेच नेते एकमेकांची गळाभेट घेताना, हास्य मस्करी करतानाही दिसतात. राष्ट्रवादीचे (ncp) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) आणि भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांच्याबाबतीत काहीसं असंच म्हणता येईल. गेल्या काही वर्षात दोघांमध्ये कमालीचं वितुष्ट आलं आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोन नेते सोडत नाहीत. हे दोन्ही नेते एकमेकांवर अगदी जहरी टीका करतानाही दिसतात. पण आज मात्र, हे दोन्ही नेते अचानक भेटले. त्यावेळी दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं. खडसेंनी तर महाजन यांच्या खांद्यावर हात ठेवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. निमित्त होतं विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्याचे.

राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. तर भाजपने उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. खापरे या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधान भवनात आल्या होत्या. त्यांच्यासोबत गिरीश महाजनही होते. महाजन हे खालच्या फ्लोअर उभे होते. तितक्यात समोरून खडसे यांचा ताफा आला. यावेळी खडसे यांचे समर्थक नाथाभाऊ खडसे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैच्या घोषणा देत होते. खडसेंसोबत असंख्या कार्यकर्ते होते. त्यांची कन्या रोहिणी खडसेही सोबत होत्या. खडसे येत असल्याचं पाहून महाजन बाजूला झाले आणि त्यांनी खडसेंना वाट मोकळी करून दिली. महाजन तिथे आहेत हे खडसेंना माहीत नव्हतं. ते पुढे निघून गेले.

हे सुद्धा वाचा

अन् महाजन हात जोडतच आले

थोडं पुढे गेल्यावर खडसे थोडे थांबले. खडसे गर्दीत होते. तिथेच रोहिणी खडसे यांनी महाजनही समोर असल्याचं सांगितलं. तेवढ्यात महाजनही वळले. महाजन वळताच खडसे आणि महाजन यांची नजरानजर झाली. दोघांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं. त्यानंतर महाजन पुढे चालत गेले. महाजनांनी दोन हात जोडले. तर खडसेंनीही नमस्कार करत हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. दोघांनी हातात हात मिळवला.

नंतर खडसेंनी महाजनांच्या खांद्यावर हात ठेवला. खडसे प्रचंड आनंदी होते. महाजन यांच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर खडसे यांनी डोळ्याला हात लावला. ते भारावून गेल्यासारखे दिसत होते. दोघेही एकमेकांशी दोन मिनिटं बोलले. यावेळी महाजनांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे स्मितहास्य होतं. तर खडसेही प्रचंड रिलॅक्स झाल्यासारखे दिसत होते. मात्र, महाजन आणि खडसेंनी एकमेकांच्या हातात हात मिळवलेला पाहून अनेकांच्या भुवया चढवल्या. राजकारणातील दोन कट्टर वैरी इतक्या आत्मियतेने भेटल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला. तर काही कार्यकर्ते सुखावले होते.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.