AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : सैफ अली खानला चाकू मारला की….नितेश राणेंच खळबळजनक वक्तव्य VIDEO

Nitesh Rane : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मागच्या आठवड्यात चाकू हल्ला झाला. त्यामध्ये सैफ गंभीररित्या जखमी झाला होता. वांद्रयाच्या लिलावती रुग्णालयात त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दोन राजकीय नेत्यांनी या हल्ल्याबद्दल संशय व्यक्त केला आहे.

Nitesh Rane : सैफ अली खानला चाकू मारला की....नितेश राणेंच खळबळजनक वक्तव्य VIDEO
Nitesh Rane-Saif Ali Khan
| Updated on: Jan 23, 2025 | 8:39 AM
Share

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मागच्या आठवड्यात चाकू हल्ला झाला. एका बांग्लादेशी चोराने सैफच्या घरात घुसून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने तो या हल्ल्यातून बचावला. सैफ अली खान-करीना कपूर हे जोडपं वांद्र्याच्या सतगुरु शरण इमारतीत 12 व्या मजल्यावर राहतं. चोराने पाईपद्वारे घरात प्रवेश केला. घरात घुसलेल्या या चोरासोबत झालेल्या झटापटीत सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याच्या पाठिच्या मणक्याजवळच्या भागात चोराने चाकू खूपसला होता. सैफ अली खानवर तब्बल पाच ते सहा तासात दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी शस्त्रक्रिया करुन सैफच्या पाठितून 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा काढला. त्याशिवाय कॉसमेटिक सर्जरी करण्यात आली. सैफ अली खानला दोन दिवसांपूर्वी मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

सैफ रुग्णालयातून स्वत:च्या पायावर चालत घरी आला. त्यावेळी त्याच्या मानेजवळच्या भागात बँडेज केल्याच दिसत होतं. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स पॅन्ट अशा पेहरावात सैफ घरी आला. सैफ चालत घरी येत असल्याची दृश्य मीडियाने टिपली. सैफने मीडियाच्या कॅमेऱ्यांच्या दिशेने हात उंचावून तो फिट असल्याच सांगितलं. सैफचा फिटनेस पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. काहींनी जाहीरपणे त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या. आता यावरुन वाद निर्माण झाला आहे. सर्वात आधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांनी सैफ अली खानच्या चाकू हल्ल्यावर संशय व्यक्त केला.

शिवसेना नेत्याकडून पहिला संशय व्यक्त

‘डॉक्टरांनी म्हटलं होतं की सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच आतमध्ये चाकू घुसला होता. कदाचित तो चाकू आत अडकला असावा. सलग सहा तास शस्त्रक्रिया झाली. हे सर्व 16 जानेवारी रोजी घडलं. आज 21 जानेवारी आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट? तेसुद्धा फक्त पाच दिवसात? कमाल आहे,’ असं ट्विट निरुपम यांनी केलं. त्यानंतर आता आमदार आणि फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा असच वक्तव्य केलं आहे. ‘नालायकपणा किती आहे’

सैफला बिघतल्यावर मलाच संशय येतो. खरच चाकू मारला की अॅक्टिंग करतोय असं मंत्री नितेश राणे म्हणाले. “बांग्लादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले. नालायकपणा किती आहे. आधी फक्त नाक्यावर उभे रहायचे. आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील. सैफ बाहेरुन असा चालत होता की, मलाच संशय आला याला खरच कोणी चाकू मारला की हा अॅक्टिंग करुन बाहेर पडला. असं टुणटुण करुन” असं नितेश राणे म्हणाले.

या औलादी माझ्या मुळावर, आता मी सांगतो.. इंदुरीकरांचं थेट चॅलेंज काय?
या औलादी माझ्या मुळावर, आता मी सांगतो.. इंदुरीकरांचं थेट चॅलेंज काय?.
10 हजारामुळ महिलानी पटलवला गेम? बिहारवर पवारांचा तर्क अन् आयोगाला सवाल
10 हजारामुळ महिलानी पटलवला गेम? बिहारवर पवारांचा तर्क अन् आयोगाला सवाल.
मविआत फूट, काँग्रेस स्वतंत्र लढणार... मुंबईत फायदा महायुतीचाच?
मविआत फूट, काँग्रेस स्वतंत्र लढणार... मुंबईत फायदा महायुतीचाच?.
अजित पवार अन् शाह यांची भेट, पार्थ पवार यांचा अँगल? चर्चांना उधाण
अजित पवार अन् शाह यांची भेट, पार्थ पवार यांचा अँगल? चर्चांना उधाण.
आधी कोठारे आता निवेदिता... भाजपला समर्थन अन् विरोधकांना अडचण?
आधी कोठारे आता निवेदिता... भाजपला समर्थन अन् विरोधकांना अडचण?.
मिलिंद नार्वेकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर, कारण नेमकं काय?
मिलिंद नार्वेकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर, कारण नेमकं काय?.
ठाकरेंना मोठा झटका, काँग्रेस स्वबळावर लढणार; असलम शेख यांचं मोठं विधान
ठाकरेंना मोठा झटका, काँग्रेस स्वबळावर लढणार; असलम शेख यांचं मोठं विधान.
अलख निरंजन...हातात त्रिशूळ घेऊन गावकरी सज्ज, बिबट्याला म्हणावं ये आता
अलख निरंजन...हातात त्रिशूळ घेऊन गावकरी सज्ज, बिबट्याला म्हणावं ये आता.
पराभव स्वीकारा, जो जिता वही सिंकदर...फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार काय?
पराभव स्वीकारा, जो जिता वही सिंकदर...फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार काय?.
नको तिथं चोच मारायची...निवेदिता सराफ यांच्यावर किशोरी पेडणेकर भडकल्या
नको तिथं चोच मारायची...निवेदिता सराफ यांच्यावर किशोरी पेडणेकर भडकल्या.