नगरमध्ये पुन्हा ‘राजकीय धुळवड’, विखे-थोरात-कर्डीले-राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

नगरमध्ये पुन्हा 'राजकीय धुळवड', विखे-थोरात-कर्डीले-राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

ग्रामपंचायत निकालाचा गुलाल संपतो ना संपतो तोच अहमदनगरमध्ये पुन्हा राजकीय धुळवड पाहायला मिळणार आहे.

Akshay Adhav

|

Jan 20, 2021 | 2:52 PM

अहमदनगर : राज्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. दोन दिवसांपूर्वी निकालही लागले. त्या निकालाचा गुलाल संपतो ना संपतो तोच अहमदनगरमध्ये पुन्हा राजकीय धुळवड पाहायला मिळणार आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगरमधील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Ahmednagar District Co Operative bank Election)

अहमदनगरला जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये. जिल्हा बँकेसाठी अनेक आजी माजी मंत्री आणि आमदारांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या असून जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. नगर जिल्हा बँकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. निवडणुकीसाठी सध्या अर्ज वाटपाला सुरुवात झालीये. मंगळवारी पहिल्या दिवशी 23 जणांनी 153 अर्ज घेतले आहेत.

सहकारी बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 25 जानेवारीपर्यंत आहे. उमेदवारी अर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी विविध तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी दीडशेहून अधिक अर्ज घेतले.

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे, मंत्री शंकरराव गडाख, अशा दिगग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन नगर जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र काँग्रेस आणि शिवसेनेने यासंबंधी कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. दुसरीकडे भाजपाच्या गोटात आतापर्यंत शांतता होती. परंतु अर्ज वाटपाची प्रक्रिया सुरु होताच भाजपने मरगळ झटकून निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं सांगितलंय.

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मोट बांधण्याचे मोठे आव्हान आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. अन्य पक्षातील नेत्यांना पक्षात एन्ट्री देऊन त्यांना उमेदवारी देणार असल्याचे राष्ट्रवादीने म्हटलंय. त्यामुळे राष्ट्रवादीत कोण एन्ट्री करणार?, ही निवडणूक कशी होणार? कोण बाजी मारणार? यार्ची चर्चा संपूर्ण नगर जिल्ह्यात ऐकायला मिळतीये.

(Ahmednagar District Co Operative bank Election)

हे ही वाचा

एका तासात थाळी संपवा, बुलेट जिंका, पुण्यातील हॉटेलची सुसाट ऑफर

सहा लाखांचे कबुतर विकत घ्या, मुलाचा मृत्यू टळेल, पुण्यातील कुटुंबाची अंधश्रद्धेतून लूट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें