आधी वंचितला काडीमोड, आता स्वतःचे उमेदवार जाहीर, एमआयएमची 'आघाडी'

पुण्यातील वडगाव शेरी, मालेगाव आणि नांदेड उत्तरमधून उमेदवार (AIMIM vidhansabha candidates list) जाहीर करण्यात आले आहेत. आणखी एकाही प्रमुख पक्षाने विधानसभेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही.

आधी वंचितला काडीमोड, आता स्वतःचे उमेदवार जाहीर, एमआयएमची 'आघाडी'

औरंगाबाद : एमआयएमने विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतल्याचं चित्र आहे. कारण, अगोदर वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेतल्यानंतर एमआयएमने तीन जागांसाठीचे उमेदवार (AIMIM vidhansabha candidates list) जाहीर केले आहेत. यामध्ये पुण्यातील वडगाव शेरी, मालेगाव आणि नांदेड उत्तरमधून उमेदवार (AIMIM vidhansabha candidates list) जाहीर करण्यात आले आहेत. आणखी एकाही प्रमुख पक्षाने विधानसभेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही.

कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी?

डॅनियल लांडगे, वडगाव शेरी, पुणे

मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, मालेगाव मध्य

मोहम्मद फिरोज खान, नांदेड उत्तर

वंचित बहुजन आघाडीशी फारकत

सन्मानजनक जागा मिळत नसल्याने एमआयएमने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर तातडीने स्वतःचे उमेदवार जाहीर करण्यातही एमआयएमनेच बाजी मारली आहे. आमच्याकडून 76 जागांची मागणी करण्यात आलेली असताना वंचितने फक्त आठ जागा देण्याची तयारी दाखवली होती, असं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं.

वंचित बहुजन आघाडी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याविरोधात उभी केली होती. त्यांना काँग्रेससोबतच जायचं असेल तर ते अगोदर सांगायला हवं होतं, असंही इम्तियाज जलील म्हणाले. आमच्याकडे व्होट बँक नाही असं प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल, पण निवडणुकीत त्यांना दिसेलच, असा इशाराही त्यांनी दिलाय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *