गणेश नाईक मतदारसंघातील कामं करत नाहीत, मला सीमोल्लंघन करावंच लागेल, मंदा म्हात्रे गरजल्या

ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) आणि बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांच्या संघर्षाचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे.

गणेश नाईक मतदारसंघातील कामं करत नाहीत, मला सीमोल्लंघन करावंच लागेल, मंदा म्हात्रे गरजल्या
Ganesh Naik_Manda Mhatre

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) भाजपच्या (BJP) दोन आमदारांचं वैर पुन्हा एकदा उफाळून आल्याचं चित्र आहे. ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) आणि बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांच्या संघर्षाचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे. कारण मंदा म्हात्रे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन, ऐरोली विधानसभेत आमदार असलेले गणेश नाईक मतदार संघातील कामे करत नाहीत, असा हल्लाबोल केला. थेट पत्रकार परिषद घेऊन हा आरोप मंदा म्हात्रे यांनी केल्याने आता गणेश नाईक काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवी मुंबईतील दोन्ही भाजपा आमदारांमधील विस्तव गेल्या काही वर्षापासून जाता जाईना झाला आहे. गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळीही मंदा म्हात्रे यांनी जोरदार विरोध केला होता. गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाने सुरु असलेली धुसफूस पुन्हा एकदा टोक गाठताना दिसत आहे. शहरातील दोन्ही आमदारांच्या भांडणात भाजपातील कार्यकर्ते मात्र पिसले जात आहेत.

इतकंच नाही तर सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी मला सिमोल्लंघन करून नाईकांच्या मतदारसंघात जावे लागणार असंही मंदा म्हात्रे यांनी म्हटलं आहे. ऐरोली विधानसभेत जावून येथील आगरी कोळी लोकांसाठी खाडीकिनारी जेट्टी उभारणार असून इतरही कामे हाती घेणार असल्याचे मंदा म्हात्रे यांनी जाहीर केले आहे.

गणेश नाईकांचं नवी मुंबईवर वर्चस्व

गणेश नाईक शिवसेनेतून राष्ट्रवादीत असल्यापासून नवी मुंबई आणि ठाणे या भागातील दिग्गज नेते आहेत. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता होती. गणेश नाईक आधी शिवसेनेत होते. 1990 मध्ये ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेमुळे गणेश नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला. ते भाजप नेत्या मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभूत झाले. भाजपच्या तिकीटावर 2019 मध्ये ते ऐरोली मतदारसंघातून रिंगणात उतरले आणि विजयी झाले. मात्र एका पक्षात असूनही म्हात्रे आणि नाईक यांच्यात विस्तव जात नाही.

संबंधित बातम्या  

आशिष शेलार नवी मुंबई दौऱ्यावर, मंदा म्हात्रेंशी भेट, नाईकांसोबत मतभेद मिटवण्याचे प्रयत्न?

गणेश नाईकांचं समर्थक नगरसेवकांना स्नेहभोजन, नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का?

गणेश नाईकांच्या प्रवेशाला विरोध, मुख्यमंत्र्यांच्या भेटीत मंदा म्हात्रेंची नाराजी दूर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI