VIDEO : परिवर्तन यात्रेदरम्यान अजितदादा आणि धनंजय मुंडेंचा ‘नाईट वॉक’

VIDEO : परिवर्तन यात्रेदरम्यान अजितदादा आणि धनंजय मुंडेंचा 'नाईट वॉक'


गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन यात्रेला सुरुवात केली आहे. आज रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपला आवाज बुलंद केला. या दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नाईट वॉक केला. “लोकांची काम करत असताना स्वतः तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे असते. त्यामुळे संधी मिळाली तर दररोज चार ते पाच किलोमीटर पायी चालण्याचा प्रयत्न करत असतो” असे अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.

आज सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन, राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा दणक्यात सुरू झाली. रायगडावर या टोकावरून त्या टोकावर पायपीट करून दिवसभरात दोन सभा झाल्या. त्यानंतर संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी जाताना तब्बल सहा किलोमीटरचा नाईट वॉक माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी केला.

कंधो से मिलते हैं कंधे!

दिवसभर काम करून अजितदादा ज्या तडफेने चालत होते, ते बघून भल्याभल्यांना कडाक्याच्या थंडीत घाम फुटला असे म्हणावे लागेल. अजित पवारांपेक्षा वयाने लहानांना धाप लागत होती. पण विविध विषयांवर चर्चा करत, अजित पवार झपाझप अंतर कापत होते आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून धनंजय मुंडे चालताना अनेकजण येऊन दोघांशी संवाद साधत होते. देशात आणि राज्यात परिवर्तनाचा निर्धार करणारे दोघेही हसतमुखाने सर्वांशी संवाद साधताना बघून अनेकांनी आश्चर्यानी तोंडात बोट घातली नसती तर नवलचं!

पाहा व्हिडीओ :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI