नो कमेंट, नो कमेंट, मी काही बोलणार नाही, फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांची प्रतिक्रिया

नो कमेंट, नो कमेंट, मी काही बोलणार नाही, फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांची प्रतिक्रिया
Maharashtra, Nov 23 (ANI): Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis shakes hand with Deputy Chief Minister Ajit Pawar after the oath taking ceremony in Mumbai on Saturday. (ANI Photo)

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय गौप्यस्फोटाविषयी पहिली प्रतिक्रिया दिली (Ajit Pawar on Devendra Fadnavis claim).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 27, 2020 | 3:58 PM

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रासह देशातील राजकारणात भूकंप करणाऱ्या महाराष्ट्रातील पहाटेच्या शपथविधीबद्दल आजपर्यंत मौन पाळले. मात्र, अनेकांना अजित पवार यांची यावर काय प्रतिक्रिया आहे याविषयी मोठी उत्सुकता आहे. आता अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटाविषयी पहिली प्रतिक्रिया दिली (Ajit Pawar on Devendra Fadnavis claim). ‘त्या ऑफरवर मला काहीच बोलायचं नाही. तो माझा अधिकार नाही,’ असं मत त्यांनी व्यक्त केलं. यातून अजित पवारांनी याआधी प्रमाणेच या नाजूक विषयावर बोलण्यास टाळाटाळ केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर विचारले असता अजित पवार म्हणाले, “त्या ऑफरवर मला काहीच बोलायचं नाही. नो कमेंट्स. यावर काहीही बोलायचा माझा अधिकार नाही. या विषयावर शरद पवार बोलतात.”

हेही वाचा : काल शरद पवार म्हणाले, लवकरच सविस्तर बोलेन, आज अजित पवार म्हणतात सध्या काही बोलणार नाही!

साताऱ्यात आज (27 जून) रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनिमित्तीने शरद पवार, अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी नेते साताऱ्यात उपस्थित होते. दरम्यान, दुपारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

बारामतीशी तुलना करत अजित पवारांचा साताऱ्याला टोमणा

साताऱ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्नावर अजित पवार यांनी सातारकारांना चांगलाच टोमणा लगावला. ते म्हणाले, “शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय यापूर्वीच मंजूर केला. मात्र, जागेचा प्रश्न निर्माण झाला. दुसरीकडे बारामतीच्या महाविद्यालयाचं काम पूर्ण होऊन सुरु झालं. त्यामुळं साताऱ्यातील काम पूर्ण झालं नाही, असं म्हणणं योग्य नाही.”

आमदार निधीतील 1.5 कोटी रक्कम ही सरकारी कार्यालयाला देण्याचा महत्वाचा निर्णय

“आमदार निधीतील 1.5 कोटी रक्कम ही सरकारी कार्यालयाला देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. साताऱ्यात पक्कं हेलिपॅड बांधण्याच्या सूचना केल्या आहेत. आघाडी सरकारच्या काळात कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही. सर्व कामं सुरु राहतील,” असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना पूर्वीच्या तुलनेत अडीच पट भरपाई

चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांना पूर्वीच्या तुलनेत अडीच पट नुकसान भरपाई दिल्याचंही अजित पवार यांनी यावेळी नमूद केलं.

‘कोणत्याही सरकारला नागरिकांना मनस्ताप व्हावा, असं वाटतं नाही’

अजित पवार म्हणाले, “कोरोनामुळे 3 महिने अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. आता कोरोना रिपोर्ट पूर्वीच्या तुलनेत खूप लवकर येत आहेत. पूर्वी 4 दिवस लागत होते, मात्र आता 8 तासात चाचणीचा अहवाल मिळतो. पुण्यात 1 लाख टेस्टिंगसाठी पालिकेने टेंडर काढले आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात येण्या जाण्यावर जिल्हा बंदी आहे. मात्र शेतीच्या कामासाठी सीमेवरील नागरिकांना सवलत आहे. कोणत्याही सरकारला नागरिकांना मनस्ताप व्हावा, असं वाटतं नाही. कोरोना संदर्भात काहीच लपवून करायचं नाही हे आम्ही सांगत आहोत.”

आता बस, काही प्रमाणत रेल्वे, विमान सुरु झाले आहेत. केंद्र पण अनेक अटी शिथिल करत आहे. हेअर सलून पण सुरु होत आहे. 100 दिवस सर्व बंद होते. गरजूंना अन्नधान्य दिलं. काही करुन या संकटातून राज्याला बाहेर काढायचं आहे, असंही ते म्हणाले.

साताऱ्यात सोमवारपर्यंत कोविड चाचणी सेंटर सुरु करण्याच्या सूचना

अजित पवार म्हणाले, “जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाचा आढावा घेतला. कोणतीही कमतरता सरकारकडून भासणार नाही. सातारा येथे सोमवारपर्यंत कोविड चाचणी सेंटर सुरु करण्याच्या सूचना केल्या आहेत.”

“लॉकडाऊन संदर्भात राज्यात गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र शिस्त लावण्यासाठी नियमांवर बोट ठेवावं लागतं. जनतेच्या भल्यासाठी हे करतोय. कोण माझं वाकडं करतंय, असं नकोय. सर्वांनी नियमांमध्ये राहावे. पुणे जिल्ह्यापेक्षा सातारा जिल्ह्याने पवार आणि एनसीपीला खूप प्रेम दिलंय. सातारा हद्दवाढ हा पण प्रश्न लवकरच सोडवून टाकू,” असं त्यांनी सांगितलं.

‘चीनमधील उद्योगांना आकर्षित करण्यासाठी 7 दिवसात परवानगी’

चीनमधील उद्योगांना भारतात कसं आकर्षित करायचं याला प्राधान्य आहे. या उद्याोगांना 7 दिवसांमध्ये परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

“लायकी पाहून बोलावं, सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते”

“आपली योग्यता काय? आपण बोलतो काय? याशिवाय आपण कुणाबद्दल बोलतोय? सूर्याकडे पाहून थुंकल्यावर थुंकी तोंडावरच उडते“, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केला (Ajit Pawar on Gopichand Padalkar). भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवर अजित पवार यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी पडळकरांवर सडकून टीका केली.

“लायकी नसलेल्या लोकांनी बोलणं योग्य नाही. आपल्या समाजात प्रसिध्दी मिळवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. आपली पात्रता पाहून बोलावं. याशिवाय त्यांना जनतेनी जागा दाखवली आहे”, अशी टीका अजित पवारांनी केली. “एखाद्याला नको तेवढं मोठं केल्याचा हा परिणाम आहे. पडळकरांचं बारामतीत डिपॉझिट जप्त झालं होतं”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संपूर्ण देश ओळखतो. कोणतंही संकट असो ते गप्प बसत नाहीत, ते सदैव काम करत असतात. संकट काळात या वयातही ते सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात”, असं अजित पवार म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार यांचा शब्द कधी ढळला नाही. काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी मोठ्या लोकांवर टीका करतात. मात्र, आता गुन्हा दाखल झाला आहे. कायदा आपलं काम करेल”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा :

आज गौप्यस्फोट करतोय, थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, चर्चाही झाल्या, पण पवारांनी भूमिका बदलली : फडणवीस

आयुष्यात काही बदलायची संधी मिळाली, तर पहाटेचा शपथविधी बदलाल का? फडणवीस म्हणतात…

लायकी पाहून बोलावं, सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते : अजित पवार

कशाला बोलायचं, अनेकवेळा डिपॉझिट जप्त केलंय, शरद पवारांची पडळकरांवर पहिली प्रतिक्रिया

काल शरद पवार म्हणाले, लवकरच सविस्तर बोलेन, आज अजित पवार म्हणतात सध्या काही बोलणार नाही!

संबंधित व्हिडीओ:


Ajit Pawar on Devendra Fadnavis claim

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें