‘ज्या विषयावर बोलणार नाही, त्यावर विचारुन काय फायदा?’ पार्थबाबतच्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पार्थ पवार यांच्या नाराजीविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी पुन्हा एकदा या विषयाला बगल दिली आहे (Ajit Pawar on Parth Pawar issue).

'ज्या विषयावर बोलणार नाही, त्यावर विचारुन काय फायदा?' पार्थबाबतच्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पार्थ पवार यांच्या नाराजीविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी पुन्हा एकदा या विषयाला बगल दिली आहे (Ajit Pawar on Parth Pawar issue). ज्या विषयावर मी बोलणारच नाही, त्या विषयावर विचारुन काय फायदा? असं म्हणत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं. ते पुण्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. यावेळी त्यांनी कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि ई-पासच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.

विशेष म्हणजे याआधीही अजित पवार यांना याविषयी विचारण्यात आलं होतं. तेव्हाही त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला होता. पत्रकारांनी अजित पवार यांना पार्थविषयी प्रश्न विचारला त्यावर त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. तसेच मला कुणाशीही काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे, असं मत व्यक्त केलं.

ई-पासबाबत बोलताना अजित पवार यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं सांगितलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ई-पासबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकार देशाला डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेत आहे, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : शरद पवार बोलले पार्थला, शब्द बोचले अजित पवारांना, आता पार्थ अन्य सदस्यांशी चर्चा करणार?

“अरे कशाला दाऊद-दाऊद करत बसलाय, केंद्र सरकार सक्षम”

अजित पवार यांनी कुख्यात दहशतवादी पाकिस्तानमध्ये असल्याच्या मुद्द्यावरुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “कशाला दाऊद-दाऊद करत बसलाय. कोणीतरी काहीतरी टीव्हीवर दाखवत आहे. काल दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याचं सांगितलं. आज आमच्याकडे दाऊद नाही दाखवतं आहेत,” असं म्हणत अजित पवार यांनी माध्यमांवर निशाणा साधला. तसेच हा विषय एका दृष्टीने महत्त्वाचा असून तो पाहण्यासाठी केंद्र सरकार सक्षम असल्याचंही सांगितलं.

अजित पवार म्हणाले, “अरे कशाला दाऊद-दाऊद करत बसला आहात. कोणीतरी काहीतरी टीव्हीला दाखवतं. काल दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याचं दाखवलं. आज पाकिस्तान दाऊद आमच्याकडे नाही म्हणत असल्याचं दाखवतं आहेत. तो एका दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. मात्र, त्या टोळीने वातावरण खराब करण्याचं काम केलं आहे. केंद्र सरकार आणि संबंधित अधिकारी चर्चा करतील आणि निर्णय घेतील. ते सक्षम आहेत. आम्ही त्यात वक्तव्य करणं बरोबर नाही.”

संबंधित बातम्या :

‘मला कुणाशीही काही बोलायचं नाही’ पार्थ पवारांविषयी बोलण्यास अजित पवारांचा नकार

पवार कुटुंब आदर्श, शरद पवार, अजित पवार आणि पार्थ एकत्रित बसून एका मिनिटात प्रश्न सोडवतील : राजेश टोपे

Pawar Family | अजित पवार-पार्थ पवार बारामतीला जाणार, श्रीनिवास पवारांच्या घरी कौटुंबिक बैठक

संबंधित व्हिडीओ :


Ajit Pawar on Parth Pawar issue

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI