नव्याचे नऊ दिवस, पक्षाने तिकीट कापले हीच यांची विश्वासार्हता; अजित पवारांचा बावनकुळेंना ‘त्या’ वक्तव्यावरून टोला

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज भाजप (BJP) आणि शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर देखील निशाणा साधाला आहे.

नव्याचे नऊ दिवस, पक्षाने तिकीट कापले हीच यांची विश्वासार्हता; अजित पवारांचा बावनकुळेंना 'त्या' वक्तव्यावरून टोला
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 3:24 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज भाजप (BJP) आणि शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर देखील निशाणा साधाला आहे. नव्याचे नऊ दिवस असतात. त्यांनी गप्पा मारणे बंद करावे कोणत्याही मतदारसंघात आव्हान द्या मी खंबीर आहे. यांचं विधानसभेत तिकीट कापलं, पत्नीला तिकीट नाकारलं हीच यांची पक्षातील विश्वासार्हता आहे का? असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी बावनकुळेंवर जोरदार टीका केली आहे.

स्थगिती सरकार

दरम्यान पुढे बोलताना अजित पवार यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. भाजपाने सांगावं कोणता मतदारसंघ ठेवणार आहात का? म्हणजे तिथ लढायला जातो. आम्ही हरणार म्हटल्यावर दुसरा मतदासंघ पाहिला पाहिजे असं पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

तसेच त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. सध्याचे सरकार हे स्थगिती सरकार आहे. प्रत्येक विकास कामांना स्थगिती देण्याचे काम सध्या सुरू आहे. यांना खोके सरकार म्हटलं की राग येतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांना इशारा

बारामतीला धडाका घेण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, बारामतीला धडका घ्याल तर डिपॉझिट जप्त होईल असा इशारा यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मतदारसंघात आपली ताकत आहे, लाखापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झालोय असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.  ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक झालं. मात्र या आरक्षणासाठी सर्व मेहनत ही महाविकास आघाडी सरकारने घेतली होती.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.