AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयकर विभागाच्या छाप्यांबाबत खुलासा करा, भाजपचं महाविकास आघाडीला आव्हान

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या तसेच सरकार दरबारी असलेली कामे करून घेण्यासाठी मध्यस्थांची यंत्रणा कोणत्या मार्गाने संपत्ती गोळा करते आहे, याची माहिती या छाप्यांतून उघड झाली आहे. या बाबत आघाडी सरकारने खुलासा करावा, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली.

आयकर विभागाच्या छाप्यांबाबत खुलासा करा, भाजपचं महाविकास आघाडीला आव्हान
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 7:10 PM
Share

मुंबई : राज्यात आयकर विभागाचं धाडसत्र सुरुच आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींकडे आयकर विभागानं छापे टाकले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. आयकर विभागाने महाराष्ट्रात घातलेल्या छाप्यांतून उघड झालेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या तसेच सरकार दरबारी असलेली कामे करून घेण्यासाठी मध्यस्थांची यंत्रणा कोणत्या मार्गाने संपत्ती गोळा करते आहे, याची माहिती या छाप्यांतून उघड झाली आहे. या बाबत आघाडी सरकारने खुलासा करावा, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. (Keshav Upadhyay challenges Mahavikas Aghadi government to disclose income tax raids)

‘या कारवाईतून अनेक वाझे समोर येणार’

उपाध्ये यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आयकर विभागाच्या छाप्यात सरकारे जमिनीचे हस्तांतरण तसेच सरकारी मान्यता मिळवून देण्यापर्यंतच्या कामांत मध्यस्थांची साखळी कशी गुंतलेली होती याची माहिती समोर आली आहे. सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचे खंडणी प्रकरण उघडकीस आले, त्यावेळी भाजपाने प्रत्येक खात्यात असे किती वाझे आहेत, अशी विचारणा केली होती. आयकर विभागाच्या छाप्यातून उघड झालेली माहिती पाहता असे अनेक वाझे राज्य सरकारच्या यंत्रणेत कार्यरत असल्याचे दिसत आहे. 1 हजार 50 कोटींच्या व्यवहारांची माहिती आयकर खात्याला आतापर्यंत मिळाली आहे. आघाडी सरकारने या संदर्भात खुलासा करण्याची आवश्यकता आहे.

‘शेतकऱ्यांचा कळवळा असता तर मुख्यमंत्री मुंबईबाहेर पडले असते’

अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एका पैशाचीही मदत न करणाऱ्या आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील घटनेबाबाबत महाराष्ट्र बंदची हाक देऊन आपला ढोंगीपणा दाखवला आहे. आघाडी सरकारला शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असता तर मुख्यमंत्री मुंबईबाहेर पडले असते आणि शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले असते. मात्र मुख्यमंत्री मुंबईत घरातच बसून आहेत. आघाडी सरकारचे हे मगरीचे अश्रू आहेत. गोवारी मोर्चावर व मावळ गोळीबारावेळी राज्यात राष्ट्रवादी व काँग्रेसचेच सरकार होते. हे जनता व शेतकरी विसरलेली नाही, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावलाय.

नवाब मलिकांच्या आरोपाला प्रत्युत्तर

अंमली पदार्थांच्या सेवनाने उद्ध्वस्त होऊ पाहणाऱ्या तरुणाईला वाचविण्यासाठी केंद्र सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ( एनसीबी ) मुंबईत एका क्रूझ वर केलेली कारवाई योग्यच आहे. अशा कारवाईला विरोध करणाऱ्यांनी तरुणाईला वाचविण्यासाठी अशा मोहिमांना तुमचा पाठिंबा आहे की नाही, याचे उत्तर द्यावं, अशा शब्दात उपाध्ये यांनी नवाब मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

इतर बातम्या :

‘मी सांगितलं होतं निवडून येऊ देणार नाही, मग पाडलं काय म्हणता’, अजितदादांचा शिवतारेंना खोचक टोला

‘माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार’, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांना नोटीस

Keshav Upadhyay challenges Mahavikas Aghadi government to disclose income tax raids

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.