अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पदभार घेण्यापूर्वीच अजित पवार (Ajit Pawar resigns as DCM) यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मॅरेथॉन भेटी घेत, अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादीतच ठेवण्यात यश मिळवलं आहे.

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पदभार घेण्यापूर्वीच अजित पवार (Ajit Pawar resigns as DCM) यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मॅरेथॉन भेटी घेत, अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादीतच ठेवण्यात यश मिळवलं आहे. सर्व दिग्गजांनी भेटी घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांची भेट अजित पवारांसाठी (Ajit Pawar resigns as DCM) निर्णायक ठरली. सदानंद सुळे यांनी आज सकाळी हॉटेल ट्रायडंटमध्ये अजित पवारांची भेट घेऊन, त्यांचं मन वळवल्याचं सांगण्यात येत  आहे. अखेर 23 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी 3 दिवसात पदभार न स्वीकारताच राजीनामा दिला.

सदानंद सुळेंच्या भेटीनंतर अजित पवार थेट वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवारांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा धक्का तर राष्ट्रवादीसाठी तितकाच मोठा दिलासा आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना जवळपास 5 वेळा अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवारांची भेट घेऊन मन वळवण्याचा प्रयत्न केला.

शनिवारी (23 नोव्हेंबर) दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि सुनिल तटकरे यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर रविवारी जयंत पाटील दोनदा अजित पवार यांच्या घरी जाऊन दोनदा भेट घेतली. सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील अन्य सदस्यांनी देखील व्यक्तिगतपणे संपर्क करुन त्यांना परतण्याचे आवाहन केले. रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांना परतण्याची विनंती केली.

पदभार स्वीकारलाच नाही

देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा पदभार काल स्वीकारला. त्यामुळे अजित पवारही कालच उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार होते. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाच नसल्याचं समोर आलं. मंत्रालयात गेलेले अजित पवार कार्यभार न स्वीकारताच चर्चगेटमधील घरी (Ajit Pawar Returns without taking charge) परतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मनधरणीचे केलेले प्रयत्न यशस्वी ठरण्याची चिन्हं दिसत होती.

चार तास चर्चा

अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत शनिवारी (23 नोव्हेंबर 2019) भल्या सकाळी उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घेतला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अजित पवारांच्या मनधरणीचे अतोनात प्रयत्न केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे यांनी काल तीन-चार तास चर्चा केली. या मनधरणीचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

अजित पवारांचा शपथविधी

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारी पहाट शनिवारी 23 नोव्हेंबरला उजाडली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने खळबळ उडाली. कारण शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चर्चा सुरु होती, त्यामध्ये अजित पवार अग्रस्थानी होते. आदल्या रात्री शिवसेनेसोबतच्या चर्चेत असलेले अजित पवार दुसऱ्या दिवशी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI