Ajit Pawar : पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कोण? मी आणि दिलीप वळसे पाटील निर्णय घेऊ तो अंतिम : अजित पवार

मी आणि दिलीप वळसे पाटील जो निर्णय घेऊ तो मान्य असेल, असं संचालक म्हणाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. जिल्हा बँकेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होईल, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कोण? मी आणि दिलीप वळसे पाटील निर्णय घेऊ तो अंतिम : अजित पवार
AJIT PAWAR

पुणे : जिल्हा बँक सहकारी बँकेची 21 लोकांची निवडणूक झाली. काही जण बिनविरोध झाले. काही निवडणुकीच्या माध्यमातून संचालक पदावर आले. अजित पवार यांनी दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय जगताप आणि काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. मी आणि दिलीप वळसे पाटील जो निर्णय घेऊ तो मान्य असेल, असं संचालक म्हणाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. जिल्हा बँकेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होईल, असं अजित पवार म्हणाले.फेक फोन कॉलसंदर्भात पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अतुल गोयलला फोन गेला होता त्यावेळी सॉफ्टवेअरचा वापर केल्यानं त्याच्याकडेन नाव गेलं. नाव गेल्यानं त्याला संशय आला. दिलीप वळसे पाटील यांनी हे प्रकरण सायबरला कळवण्यास सांगितलं. त्याप्रमाणे सहा जणांना ताब्यात घेतलंय, असं अजित पवार म्हणाले.

त्या दिवशी लॉकडाऊन लागणार

कोरोना आढावा बैठकीला गेल्यानंतर त्याबाबत चर्चा होईल. कोरोनासंदर्भात राज्याचे निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. जिल्ह्याचा आढावा मी घेत असतो. राज्यात ज्यावेळी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काही अडचणी असतील त्यामुळं ते बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. त्याच्यावतीनं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. राज्याच्या मत्रिमंडळ बैठकीत लसी कमी पडतात त्यासंदर्भात चर्चा झाली होती. मुख्यंमंत्री कोरोना संदर्भात निर्णय घेत आहेत, ते रोज आढावा घेत आहेत.

आसाममध्ये अडकलेल्या मुलांना लागेल ती मदत करणार

राज्याच्या मदत आणि पूनर्वसन विभागाला आसाममध्ये अडकलेल्या मुलांना महाराष्ट्रात आणण्यासाठी जे काय करता येईल ते करा यासाठी सूचना दिल्या आहेत. बसनं किंवा रेल्वेनं ज्या प्रकारे त्यांना इकडे आणावं, त्यासाठी लागणारा खर्च करा, अशा सूचना दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या:

पुणे जिल्हा बँक अध्यक्ष निवडणूक, आजी-माजी आमदार रेसमध्ये, अजितदादांसह संचालक मंडळाची बैठक

दादा मला वाचवा, बघतोय रिक्षावाला संघटनेचं अनोखं आंदोलन; अजित पवार यांच्याकडे विशेष मागणी

Ajit Pawar said if oxygen demand increased to 700 mt then lockdown imposed by Uddhav Thackeray and PDCC bank Election will done unopposed

Published On - 12:33 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI