पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co Operative Bank Election)अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदी जुन्या आणि उपाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची राष्ट्रवादीची रणनीती ठरल्याची माहिती आहे. दुपारी एक वाजता निवडणूक होणार असून त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सर्व संचालकांची बैठक घेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी आमदार रमेश थोरात यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे अजित पवार कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाच्या 21 पैकी 16 जागा जिंकत राष्ट्रवादीचे बॅंकेवर एकहाती वर्चस्व मिळवलं आहे. या 16 जणांना एका अपक्षाची साथ मिळाली आहे.