AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असणारी वाहनं अडवली? तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांबाबत व्हायरल मसेजवर अजित पवार म्हणतात…

मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टता आणवी, तसेच तिथल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे? असा सवाल प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे.

Ajit Pawar : छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असणारी वाहनं अडवली? तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांबाबत व्हायरल मसेजवर अजित पवार म्हणतात...
छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असणारी वाहनं अडवली? तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांबाबत व्हायरल होणाऱ्या मसेजवर अजित पवार म्हणतात...Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 25, 2022 | 4:37 PM
Share

मुंबई : आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदे घेत पुन्हा सरकारला धारेवर धरला आहे. राज्यात झालेली अतिवृष्टी (Heavy Rain) आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून (Cabinet Expansion) त्यांनी सरकारला अनेक सवाल केलेले आहेत. तसेच तात्काळ अधिवेशन घ्या अशीही मागणी अजित पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत लावून धरली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो बाबत एक वायरल होणारी बातमी त्यावरही अजित पवारांनी सविस्तर भाष्य केलं. आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टता आणवी, तसेच तिथल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे? असा सवाल प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. हा आध्र प्रदेशातील प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

व्हायरल व्हिडिओत नेमकं काय?

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आणखी एक बातमी सातत्याने येत आहे. तिरुपती देवस्थानच्या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या वाहनांना तिथे प्रवेश नाकारला असे दाखवण्यात येत आहे. मागेही असाच प्रकार निदर्शनास आला होता, त्यावेळी मिलिंद नार्वेकर यांच्याशी मी मागेही बोललो आहे, ते त्या ठिकाणचे ट्रस्टी आहेत. ते त्या संबंधित बोलतील. कारण गैरसमज पसरत आहेत, ते दैवत आहे. दैवताबद्दल वेगळ्या बातम्या येणे हे देखील चुकीचं आहे. त्याबद्दल तुम्ही आज स्टेटमेंट करा असं मी त्यांना सांगितलं आहे, असेही अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी

तर  त्यांनी कुठली अडचण नसल्याचे सांगितलं आहे, मात्र मी त्यांना सांगितलं भाविकांच्या भावना भडकवल्या जात आहेत. आम्हाला अनेक लोक फोन करून विचारत आहेत, आपल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून असं तिथं काही घडलं आहे का? आणि त्याबाबत त्या सरकारची भूमिका काय? हे बघितलं पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

सत्यतता पाहिल्याशिवाय विश्वास ठेऊ नका

सोशल मीडियावर असे मेसेज अनेकता वायरल होत असतात. त्याचा गैरफायदा घेऊन अनेक समाजकंटक समाजात विपरीत प्रकार घडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा वायरल मेसेज ना वेळीच आळा घालून सत्यता पडताळल्याशिवाय असे मेसेज पसरवू नये असे आव्हान ही सरकारकडून अनेकदा करण्यात येते आणि अशा परिस्थितीतही त्याच आदेशांचा पालन झालं पाहिजे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.