AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला जर कळलं जाणीवपूर्वक आमच्या लोकांना त्रास दिला तर…, अजित पवारांचा रोख कोणाकडे?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. . दमदाटी करणाऱ्यांची सत्ता लवकरच जाणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मला जर कळलं जाणीवपूर्वक आमच्या लोकांना त्रास दिला तर..., अजित पवारांचा रोख कोणाकडे?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2022 | 9:34 AM
Share

मुंबई : विरोधी पक्षनेते (Opposition Leader) अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांनो (officer) कुणाच्याही दबावाला बळी पडू नका असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दबावाला बळी पडून चुकीची कामं करू नका. दमदाटी करणाऱ्यांचे सरकार जाणार आहे. आम्ही सत्तेत कधी येऊ हे कळणार देखील नाही. त्यावेळी जर मला कळाले एखाद्या अधिकाऱ्याने चुकीचे काम केले, किंवा आमच्या माणसांना जाणीवपूर्वक त्रास दिला तर खैर नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. दरम्यान आमच्या माणसांकडून जर काही चुकीची कामं झाले असतील तर  त्यांच्याविरोधात जरूर कारवाई करा, माझं काहीही म्हणण नाही असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं अजित पवारांनी?

अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. दिवस बदलत असतात. आम्ही सत्तेत कधी येऊ हे कळणार देखील नाही. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना सांगतो त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये. बळी पडून अनेकदा चुकीचे कामं होतात. तसं करू नका,  तेव्हा जर मला कळलं की एखाद्याने जाणीवपूर्वक आमच्या माणसांना त्रास दिला तर खैर नाही. आमच्या लोकांचे काही चुकले तर जरूर कारवाई करा, माझं काहीही म्हणन नसेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारवर निशाणा

अजित पवार यांनी यावेळी राज्य सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. दमदाटी करणाऱ्यांची सत्ता लवकरच जाणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडू नये असं आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केलं आहे.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.