स्वतःच्या मुलाला निवडून न आणता येणाऱ्याची मस्ती जिरली : आढळराव पाटील

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 20, 2019 | 3:57 PM

दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवाजीराव आढळराव यांच्यावर टीका करत, त्यांची पराभवामुळे मस्ती जिरली असल्याची टीका केली होती. याला आता आढळराव पाटलांनीही ((Shivajirao Adhalrao Patil)) उत्तर दिलंय. मस्ती कुणाची जिरली आहे ते राज्यातलं शेंबडं पोरही सांगू शकेल, असं आढळराव पाटील म्हणाले.

स्वतःच्या मुलाला निवडून न आणता येणाऱ्याची मस्ती जिरली : आढळराव पाटील
Follow us

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalrao Patil) पाटील यांच्यात शीतयुद्ध रंगलंय. दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवाजीराव आढळराव यांच्यावर टीका करत, त्यांची पराभवामुळे मस्ती जिरली असल्याची टीका केली होती. याला आता आढळराव पाटलांनीही (Shivajirao Adhalrao Patil) उत्तर दिलंय. मस्ती कुणाची जिरली आहे ते राज्यातलं शेंबडं पोरही सांगू शकेल, असं आढळराव पाटील म्हणाले.

प्रत्युतर देत शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरुर (Shirur loksabha election) येथे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माझ्यावर टीका करण्यात आली. परंतु ज्याला स्वतःच्या मुलाला मावळात निवडून आणता आलं नाही, त्यांनी माझ्यावर टीका करणं हा विनोद आहे. अजित पवार यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:च्या मुलाला निवडून आणायला हवं होतं, असंही आढळराव पाटील म्हणाले.

मुलाच्या पराभवाने तोंड काळवंडलं असून मस्ती माझी नाही, तर मस्ती तुमची जिरली आहे, असा घणाघात शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी केला. अजित पवार यांनी लोकसभेतील पराभवावरुन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये टीका केली होती. त्यावरून आता आढळराव पाटलांनी पलटवार केला. आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि राष्ट्रवादीतील ही जुगलबंदी चांगलीच रंगणार आहे.

माझा पराभव करण्याची हिंमत राष्ट्रवादीत कधीच नव्हती आणि नसेल. त्यामुळेच मी तीन वेळा त्यांचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात तीन वेळा निवडून आलो. माझा पराभव राष्ट्रवादी किंवा अमोल कोल्हेने केला नाही, पराभव छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेमुळे झाला, असंही आढळराव पाटील म्हणाले. शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. महाराजांची प्रतिमा पाहूनच लोकांनी मतदान केलं, असं यापूर्वीही आढळराव पाटील म्हणाले होते.

शिरुर आणि मावळ या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. मावळमध्ये अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला, तर शिरुरमध्ये आढळराव पाटलांचा निसटता पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत शिरुरमधून विजय मिळवला होता.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI