EVM विरोधात 21 ऑगस्टला मोर्चा, राज ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, राजू शेट्टींची एकत्र घोषणा

आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या या एकमुखी मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 21 ऑगस्ट रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे

EVM विरोधात 21 ऑगस्टला मोर्चा, राज ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, राजू शेट्टींची एकत्र घोषणा
Follow us
| Updated on: Aug 02, 2019 | 12:09 PM

मुंबई : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात EVM विरोधात राज्यातील बड्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकजूट दाखवली. आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या या एकमुखी मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 21 ऑगस्ट रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा सर्वपक्षीयांच्यावतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मुंबईतील एमआयजी क्लबमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात, स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी, निवृत्त न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील उपस्थित होते.

EVM आणि VVPAT ला हटवा, लोकशाही वाचवा असा नारा देत, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्या, यासाठी 21 ऑगस्ट रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा दिसणार नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

राज ठाकरे काय म्हणाले?

ईव्हीएमविरोधी या मोहीमेत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख आज उपस्थित आहेत. भाजपा आणि शिवसेनेनेही यावं, असं राज ठाकरे म्हणाले.

यापुढचं आंदोलन पेटेल तिथं कोणत्याही पक्षाचं नाव नसेल. महाराष्ट्रातल्या घराघरात फॉर्म पाठवला जाईल आणि तो भरुन निवडणूक आयोगाला पाठवला जाईल.  बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी आंदोलन उभं केलं जाईल.  21 तारखेला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा असेल

यापुढे आंदोलन असंच असेल. कोणत्याही राजकीय पक्षाचं हे आंदोलन नसेल. आम्ही घरा घरात जाऊन फाॅर्म भरून घेणार. हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. यानंतरचा टप्पा नंतर सांगू- राज ठाकरे

राजू शेट्टींच्या मतदारसंघात लोक त्यांना पैसे देऊन निवडून आणतात, मात्र त्यांच्या मतदारसंघात अनेक बूथवर त्यांना शून्य मतं मिळाली, जे लोक पैसे देऊ शकतात, ते मतं देऊ शकत नाहीत का? – राज ठाकरे

चिप अमेरिकेत बनते मग त्यावर संशय नाही घेता येणार का? 371 मतदारसंघात घोळ आहे. जो मतदान करतोय त्यालाही स्वत:वर विश्वास आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही EVM वर अविश्वास दाखवला आहे.

55 लाख मतांमध्ये घोटाळा उघडकीस आला आहे. जर बॅलेट पेपरवर मतदान झालं तर मग कळेल तरी की नेमकं काय होतंय? जिथे या मशिन्स बनतात तिथेही यावर निवडणुका होत नाहीत.

प्रत्येक राज्यात उठाव होणार. त्याची सुरूवात महाराष्ट्रातून होतेय. ममता बॅनर्जींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी बंगालमध्ये असंच आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांना जर 250 जागा येतील असा विश्वास असेल, तर त्यांना बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास हरकत काय? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

मी अनेक प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले पण त्यांच्याकडे काही उत्तरं नव्हती. बसवलेल्या माणसांनी आमच्यावर बोलू नये. भाजपा एवढे आकडे सांगताहेत तर का बॅलेट पेपरवर निवडणुकीला सामोरे जात नाहीत? माझा निवडणूक आयोगावरच विश्वास नाही.

माझ्यापर्यंत इडीच काहीच आलेल नाही. मला ही माहीती तुमच्याकडूनच कळतेय – राज ठाकरे

अजित पवार काय म्हणाले?

अनेक राजकीय पक्ष, एनजीओ यांनी भूमिका घेतली आहे की अनेक देशात EVMवर निवडणुका घेत नाहीत. पारदर्शकपणे निवडणुका व्हायला हव्यात. EVM बद्दलच्या शंका घेण्यास  निश्चितपणे वाव आहे.

राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात पावलं उचलली. त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. निवडणुका पारदर्शक होत असतील तर काय फरक पडणार आहे? जनतेला ज्याला बहुमत द्यायच आहे त्यांनी द्यावं पण पारदर्शकपणा यायला हवा.

या निवडणूका बॅलेट पेपरवर व्हाव्यात. जनतेला आवाहन करतोय उद्याच्या काळात बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हाव्यात. अनेक उदाहरणं आहेत ज्यावर संशय घेतला जाऊ शकतो.

राजू शेट्टी काय म्हणाले?

21 तारखेचा मोर्चा हा कोणत्या पक्षाचा नाही तर तो मतदारांचा आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहावं. गावागावातील लोकांनी उपस्थित रहावं- राजू शेट्टी

छनग भुजबळ काय म्हणाले?  राज ठाकरे यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी या लढ्यासाठी सर्वांना एकत्र केलं. याला चांगला पाठिंबा मिळेल कारण या मशिन्सवर आम्हाला विश्वास नाही. तुम्ही जर निवडून येणारच असाल तर मग करा ना एकदा पेपरवर मतदान, काय फरक पडणार आहे?

आपण सगळ्यांनी आता पुढे येऊन निवडणुकीवर विश्वास बसला पाहिजे यासाठी या सरकारला हलवलं पाहिजे – छनग भुजबळ

बी जी कोळसे पाटील

मी 2013 पासून इव्हीएमविरोधात भांडतोय. कंपनी सांगते की ही चिप प्रोग्राम होते, 191 देशांपैकी 18 देशात ईव्हीएम आहे. ते ही देश खूप छोटे छोटे आहेत. आमचा इव्हिएमवर भरोसा नाही – बी जी कोळसे पाटील

जयंत पाटील- शेकाप

लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने हा फॉर्म भरुन द्यायला पाहिजे. जे मतदान झालं नाही त्यापेक्षा जास्त मतमोजणी होतेय, हेच सगळ्यात मोठं संशयास्पद आहे – जयंत पाटील, शेकाप-

विरोधकांची एकजूट

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ईव्हीएमविरोधात विरोधक एकवटले आहेत. महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. EVM विरोधात मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष, शेकापसह सर्व विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्याशिवाय नुकतंच त्यांनी कोलकात्यात जाऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली. त्यानंतर आता सर्वपक्षीयांनी ईव्हीएमविरोधात आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं.

एकीकडे विरोधी पक्षांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी लावून धरली असताना, तिकडे निवडणूक आयोग मात्र ईव्हीएम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असल्याचा दावा करत आहे. तसंच ईव्हीएमविषयी पसरविण्यात  येणाऱ्या  अफवांवर विश्वास ठेऊ नका ,  असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं.

ईव्हीएम कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाही. प्रत्येक ईव्हीएम राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत तपासली आणि सीलबंद केली जात असल्यानं संशय घ्यायला वाव नाही, असाही दावा निवडणूक आयोगाने केला.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.