‘स्वबळा’च्या निवडणुकीत जेव्हा काँग्रेसचे 28 मंत्री घरी गेले..!

एक अशीही निवडणूक होऊन गेली ज्यात काँग्रेस स्वबळावर लढली होती. तेही नेहरुंच्या नेतृत्वात. विशेष म्हणजे त्या निवडणुकीतल्याच मुद्यांभोवती अजूनही देशाचं राजकारण फिरतंय.

'स्वबळा'च्या निवडणुकीत जेव्हा काँग्रेसचे 28 मंत्री घरी गेले..!
Moraraji Desai_Raj Narayan Vyas_Dr Ambedkar
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 12:59 PM

मुंबई : महाराष्ट्रात सध्या ‘स्वबळ’ हा चर्चेतला शब्द आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole Congress) यांनी आगामी निवडणुकीसाठी (Election) स्वबळाचा नारा दिला आहे. काही नेत्यांना तर आताच ‘काँग्रेसच्या मुख्यमंत्रि’पदाची स्वप्नंही पडू लागली आहेत. दुसऱ्या बाजूला अशा स्वप्नातून काँग्रेस नेत्यांनी बाहेर यावं म्हणून शिवसेनेचे (Shiv Sena) नेते रोज कुठला ना कुठला फटाका फोडतायत.  शरद पवारांनी (Sharad Pawar) दिल्ली गाठलीय. पुढच्या लोकसभेची तयारी म्हणून बैठकाही सुरु केल्यात. (All you need to know about India’s first general election Congress Jawaharlal Nehru and other Political Parties where congress lost 28 ministers Maharashtra marathi)

या सगळ्या पार्श्वभूमीवर एक अशीही निवडणूक होऊन गेली ज्यात काँग्रेस स्वबळावर लढली होती. तेही नेहरुंच्या नेतृत्वात. विशेष म्हणजे त्या निवडणुकीतल्याच मुद्यांभोवती अजूनही देशाचं राजकारण फिरतंय. पण ही निवडणूक खास लक्षात राहिली ती काँग्रेस मंत्र्यांच्या पराभवामुळे. एक नाही दोन नाही तर 28 मंत्र्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. ही होती देशातली लोकसभेची पहिली निवडणूक आणि याच निवडणुकीतल्या निकालानं ‘लोक किती चमत्कारीक असतात’, त्यांना कधीच गृहीत धरु नये असा पहिला धडा राजकारण्यांना दिला होता. दीडशे वर्ष ब्रिटीश सत्ता अनुभवल्यानंतर आपण आपला सत्ताधारी निवडु शकतो याची जाणीव लोकांना चमत्कारीक वाटणारी होती.

कोण होते मतदानाचे पहिले मानकरी?

1951-52 साली लोकसभेची पहिली निवडणूक पार पडली. आता कुठलीही निवडणूक चार ते पाच फेजमध्ये घेतली गेली तर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडतात पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, लोकसभेची पहिली निवडणूक ही तब्बल 68 फेजमध्ये पार पडली होती. चार महिने लोकशाहीचा हा उत्सव सुरु होता. हिमाचल प्रदेशात तालुका होता चिन्नी. याच ठिकाणी बौद्ध भिक्षुंचा एक ग्रुप होता. तो तिबेटच्या पंचम लामांना मानायचा. देशातल्या पहिल्या सार्वजनिक निवडणुकीत मतदान करण्याचा मान ह्या ग्रुपकडे आला. कारण त्यांचं पहिल्यांदा मतदान झालं नसतं तर नंतर होऊ शकलं नसतं. त्यावेळेस हिमाचलमध्ये बर्फवृष्टीच्या काळात चिन्नी हा तालुका जगापासून तुटलेला असायचा. त्यामुळे लोकशाहीच्या मतदान वारीचे ते पहिले वारकरी ठरले.

कशी होती निवडणूक आयोगाची तयारी?

सुकूमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त होते. त्यांच्याच अधिकाराखाली जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा ‘जुगार’ खेळला गेला. ते आयसीएस (Indian Civil Service)होते. गणित हा त्यांचा आवडीचा विषय होता. इंग्लंडमध्ये शिक्षण झालं होतं. ज्या देशाची लोकसंख्या चाळीस कोटी असेल, त्यातले 85 टक्के लोक निरक्षर असतील, तिथं निवडणुका घेण्याचं धनुष्य सुकूमार सेन यांनी खांद्यावर घेतलं होतं.

17 कोटी पेक्षा जास्त मतदार होते. निवडणूक फक्त लोकसभेचीच होती असं नाही तर विधानसभाही सोबतच होत्या. त्यामुळे 4500 जागांवर निवडणूक लागलेली होती. त्यातल्या जवळपास 500 ह्या लोकसभेच्या जागा होत्या तर राहीलेल्या चार हजार विधानसभेच्या. 2 लाख 24 हजार पोलींग बूथ उभारले गेले. 20 लाख स्टीलचे बॅलट बॉक्स बनवले गेले. त्यासाठी 8 हजार 200 टन स्टीलचा वापर झाला. सहा महिन्याच्या करारावर 16 हजार 500 क्लर्कची नियुक्ती केली गेली. 56 हजार अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली मतदान पार पडलं. त्यांना 2 लाख 80 हजार मदतनीस होते. 2 लाख 24 हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात होते.

ह्या पहिल्या निवडणुकीत सर्वाधिक फटका बसला तो महिलांना. जवळपास 30 लाख महिला मतदारांची नावं मतदान यादीतून वगळावी लागली. कारण त्यांनी नावंच दिलेली नव्हती. जेव्हा मतदार याद्या तयार करायला अधिकारी गेले, त्यावेळेस महिलांनी स्वत:चं नाव सांगायलाच नकार दिला. पर पुरुषाला नाव कसं सांगावं असा कदाचित त्यांच्यावर ‘सामाजिक’ दबाव आला असावा. स्वत:चं नाव सांगण्याऐवजी अमक्याची पत्नी, तमक्याची बहिण किंवा आई अशी नावं सांगितली गेली. परिणामी अशा 30 लाख महिला देशातल्या पहिल्या मतदानाला मुकल्या. सुकूमार सेन यांच्यातला अधिकारी जागा होता.

नेहरु स्टार कँपेनर आणि प्रचाराचा मुख्य मुद्दा

देशातली ही पहिला लोकसभा निवडणूक होती. अर्थातच स्टार कँपेनर होते पंडीत जवाहरलाल नेहरु. 9 आठवड्याच्या प्रचारात नेहरुंनी जवळपास 25 हजार मैल घौडदौड केली. देशाचा कोपरा न कोपरा प्रचारानं धुंडाळून टाकला. यात त्यांनी कधी हवाई मार्गे प्रवास केला तर कधी कारने तर कधी ट्रेननं. काही ठिकाणी तर नेहरूंनी प्रचाराच्या प्रवासासाठी बोटीचाही वापर केला. पंजाबमधल्या लुधियानातून नेहरुंनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं आणि त्यांच्या निशाण्यावर होते हिंदुत्ववादी. होय, देशातल्या पहिल्या निवडणुकीत प्रचाराचा मुख्य मुद्दा होता धर्मनिरपेक्षता विरुद्ध हिंदुत्व. दिल्लीत 2 ऑक्टोबरला  म्हणजेच गांधी जयंतीला प्रचार सभा झाली. या सभेत नेहरु म्हणाले, ‘जर एखादा व्यक्ती धर्माच्या नावावर दुसऱ्या व्यक्तीवर हात उगारेल तर मी त्याच्याविरोधात सरकारमध्ये आणि बाहेरही शेवटच्या श्वासापर्यंत लढेल’. दुर्देवानं अजूनही देशातल्या निवडणुका याच मुद्यावर लढल्या जात आहेत म्हणजेच पिढ्या लोटल्या पण कट्टरता संपली नाही उलट ती धारदार झाली की काय असा संशय यायला जागा आहे.

नेहरुंच्याविरोधात कोण होते?

लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्याविरोधात तगडी फळी होती. त्यातले काही जण तर आधीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून नेहरुंचे सहकारीही होते. त्यात जयप्रकाश नारायण, कृपलानी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा समावेश होता. पण नेहरुंच्या टार्गेटवर होते ते कट्टरतावादी आणि कम्युनिस्ट. मुखर्जींच्या बंगालमध्ये प्रचार करताना नेहरु आरएसएस, जनसंघ, हिंदू महासभेवर तुटून पडले. तर जयप्रकाश नारायण, कृपलानी, आंबेडकर अशा उदारमतवादी नेत्यांबाबत मात्र ते उदार होते. प्रचारा दरम्यान त्यांनी अशा नेत्यांच्या गुणांचं कौतूक केलं. कम्युनिस्टांचा मात्र नेहरुंना कडवा विरोध होता आणि नेहरुंचाही त्यांना. प्रचारा दरम्यान काही ठिकाणी तर दोन्हींचा आमना सामना झाला. शाब्दिक चकमकीही उडाल्या. नेहरुंनी प्रचाराच्या अशा तीनशे सभांतून जवळपास दोन कोटी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यावेळेसच्या बाँबेत नेहरुंची मोठी सभा झाली होती.

मलबार हिलला सर्वात कमी मतदान

लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली ते केरळच्या कोट्टयम लोकसभा मतदारसंघात. 80 टक्क्यापेक्षा जास्त मतदारांनी हक्का बजावला तर मध्यप्रदेशातल्या शाहडोळमध्ये सर्वात कमी मतदान झालं, ते होतं फक्त 18 टक्के. इतिहासाचा असाही न्याय बघा. हैदराबादमध्ये पहिलं मतदान केलं ते निजामाने. हे तेच गृहस्थ होते जे भारतात समाविष्ट व्हायला नकार देत होते. बाँबेत 70 टक्के मतदान झालं पण श्रीमंतांच्या मुंबईत त्यावेळेसही मतदानाची टक्केवारी सर्वात कमीच होती. मलबार हिलवरच्या दोन पोलींग बूथकडे ‘श्रीमंत मुंबई’ फिरकलीच नाही. त्यादिवशीही त्यांनी टेनिस खेळणेच पसंत केले. बाकी गिरणी कामगारांच्या मुंबईनं मात्र लाईन लाऊन तेव्हाही मतदान केलं.

निवडणुकीचा निकाल कसा लागला?

लोकसभेच्या 489 जागांपैकी नेहरुंच्या काँग्रेसनं 364 जागा जिंकत देशाची सत्ता काबीज केली. पण याच निवडणुकीत त्यांच्या आधीच्या मंत्रिमंडळातले 28 मंत्री पराभूत झाले. त्यात काही बडी नावं होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बाँबे उत्तरमधून पराभव झाला होता. भलेही ते स्वतंत्र लढले होते. त्यांना काँग्रेसच्या नारायण सदोबा काजरोळकर यांनी पराभूत केलं होतं. देशाचं पंतप्रधानपद भूषवलेल्या मोरारजी देसाईंचाही याच निवडणुकीत पराभव झाला होता हेही आणखी एक या निवडणुकीचं वैशिष्ट्य.

आश्चर्य म्हणजे बाबासाहेबांचा थोड्याच काळाच्या फरकानं लोकसभेला दोनदा पराभव झाला. पहिला बाँबेत आणि दुसरा भंडाऱ्यात. भंडाऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीतही बाबासाहेब पराभूत झाले. तुम्हाला जर असं वाटत असेल की, सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान नेहरुंना मिळाला असेल तर तेही चूक. हा मान गेला तो रवी नारायण रेड्डी या कम्युनिस्ट नेत्याला. होय, तेच कम्युनिस्ट ज्यांच्यावर प्रचारात नेहरु तुटून पडले होते. नेहरु उत्तर प्रदेशातल्या फुलपूरमधून पहिल्यांदा लोकसभेवर निवडले गेले.

संबंधित बातम्या 

पवारांच्या घरी बैठक होणार, पण तिसऱ्या आघाडीसाठी नाही; तरीही तर्कवितर्क सुरूच!

तिसऱ्या आघाडीचं मॉडेल गैरलागू, तिसरी-चौथी आघाडी भाजपला आव्हान देईल असं वाटत नाही; प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.