AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambadas Danve : गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी; अंबादास दानवे यांचा घणाघाती हल्ला

Ambadas Danve : सामना जर कागदाचा लगदा आहे तर त्याची दखल का घेता? जर सामना कागदाचा लगदा आहे तर मीडिया त्यावर बातम्या का करते? तुम्ही सामनाला का सीरियसली घेता? सोडून द्या. त्यावर बोलूच नका. लगदा असेल तर हा लगदा उलटा घुसतो तेव्हा कळेल त्यांना...

Ambadas Danve : गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी; अंबादास दानवे यांचा घणाघाती हल्ला
गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी; अंबादास दानवे यांचा घणाघाती हल्लाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 15, 2022 | 1:48 PM
Share

औरंगाबाद: सामनातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी. ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, अशी टीका पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी शिवसेनेवर (shivsena) केली होती. शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती मिळाल्याने सामनातून ही टीका करण्यात आली होती. त्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पाटील यांच्या या टीकेचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) यांनी समाचार घेतला आहे. याच गुलाबरावांची दोन महिन्यांपूर्वीची भाषणे तपासली पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं सामना हे वृत्तपत्रं आहे. त्यांच्या विचारावर चालणारं हे वृत्तपत्रं आहे. त्यावर टीका करणारे गुलाबराव पाटील हेच उंदराची चिंधी आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे.

सामनातून जे सांगितलं ते सत्यच आहे. भाजपने महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली आहेत. सामना हे बाळासाहेबांच्या विचारांचं दैनिक आहे. त्यामुळे सामनावर टीका करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. टीका करणारे गुलाबराव पाटील हेच उंदराची चिंधी आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

दानवेंचे शेलारांना सवाल

मुंबईतून भ्रष्टाचाराची कीड उखडून फेकू असं विधान भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शेलारांनी शिवसेना साफ करण्याची भाषा करू नये. ही कीड उपटून टाकण्याआधी गावितांवर जे भाजपने आरोप केले होते, ती कीड शेलारांनी आधी दूर केली पाहिजे. जे खासदार शिंदे गटात आले, त्यांच्यावर भाजपने आरोप केले ती कीड दूर केली पाहिजे. सोमय्यांनी शिंदे गटातील आमदारांवर लावलेल्या आरोपांचं काय झालं? ही कीड शेलारांनी दूर केलीय का? असा सवाल त्यांनी केला.

लगदा उलटा घुसतो

सामना जर कागदाचा लगदा आहे तर त्याची दखल का घेता? जर सामना कागदाचा लगदा आहे तर मीडिया त्यावर बातम्या का करते? तुम्ही सामनाला का सीरियसली घेता? सोडून द्या. त्यावर बोलूच नका. लगदा असेल तर हा लगदा उलटा घुसतो तेव्हा कळेल त्यांना, असा इशाराही त्यांनी दिला.

खातं कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकते

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी सामनातील टीकेवर भाष्य करताना शिवसेनेवर हल्ला चढवला होता. सामनातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी. ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. खातं कुणाला कोणतं आलं त्यापेक्षा ही सामूहिक जबाबदारी सरकारची असते. मी पाणीपुरवठा मंत्री आहे. म्हणजे माझी इतर खात्यावर जबाबदारी नाहीये का? मंत्र्यांची जबाबदारी राज्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची असते. त्यामुळे खातं कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकते. त्यामुळे विरोधकांना काहीच सापडलं नाही म्हणून अशी टीका सुरू आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले होते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?