‘पंजाब में ट्विस्ट’, अंबिका सोनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत; जाखड यांना सिद्धू गटाचा विरोध

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नावे उतरली आहेत. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. (Ambika Soni likely to be next Punjab CM after Amarinder Singh's exit)

'पंजाब में ट्विस्ट', अंबिका सोनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत; जाखड यांना सिद्धू गटाचा विरोध
ambika soni

चंदीगड: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नावे उतरली आहेत. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. आता त्यात आणखी तिसरं नाव आलं आहे. ते म्हणजे ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी. सिद्धू गटाने जाखड यांच्या नावाला विरोध केल्यानेच अंबिका सोनी यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आल्याचं सांगितलं जात आहे. (Ambika Soni likely to be next Punjab CM after Amarinder Singh’s exit)

अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काल काँग्रेसच आमदारांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नाही. मात्र, सुनील जाखड आणि नवज्योतसिंग सिद्धू यांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चिली गेल्याचं सांगितलं गेल. आज होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचं नाव फायनल केलं जाणार आहे. मात्र, आज होणाऱ्या बैठकीपूर्वीच अंबिका सोनी यांचं नावही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आल्याने पंजाबमध्ये नेमकं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सोनींना हायकमांडचे आदेश

राज्यात सुरू असलेल्या सुंदोपसुंदीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने अंबिका सोनी यांना तातडीने चंदीगडला जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात असून सोनी याच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सोनी यांचं नाव फायनल

सूत्रांच्या मते अंबिका सोनी यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झालं आहे. फक्त आज त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. अंबिका सोनी या सोनिया गांधी यांच्या अंत्यत जवळच्या समजल्या जातात. त्या माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेत्या आहेत. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही सिद्धू आणि अमरिंदर सिंग गटाच्या कुरघोडी सुरूच राहू शकतात. सिद्धू गटाने जाखड यांना विरोध केल्याने जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रीद जाखड आणि सिद्धू गटातही तू तू मै मै होऊ शकते. त्यामुळेच अंबिका सोनी यांचं नाव फायनल केल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. अंबिका सोनी यांना मुख्यमंत्रीद दिल्यास गटातटाच्या राजकारणाला तिलांजली दिली जाऊ शकते. तसेच दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्याचा काँग्रेसला फटका बसणार नाही, म्हणूनच सोनी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल केल्याचंही सांगितलं जात आहे. शिवाय सोनी या हिंदू खत्री असल्यानेही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

उद्या शपथविधी

दरम्यान, पंजाबमध्येही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. अंबिका सोनी मुख्यमंत्री झाल्यास सिद्धू आणि दलित चेहरा म्हणून डॉय राजकुमार वेरका यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. उद्या चंदीगडमध्ये छोटेखानी समारंभात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. (Ambika Soni likely to be next Punjab CM after Amarinder Singh’s exit)

 

संबंधित बातम्या:

पंजाबसाठी मोठा दिवस, काँग्रेसचं मुख्यमंत्रीपदाचं नाव जवळपास निश्चित, सत्तेचा फॉर्म्युलाही ठरला, सिद्धूंचं काय होणार?

कोण आहेत सुनिल जाखड, ज्यांचं नाव पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक आघाडीवर आहे? वाचा सविस्तर

क्रिकेट असो की राजकारण… ‘कॅप्टन’विरोधात सिद्धूंचं कायम बंड; सेकंड इनिंगमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग ‘क्लीन बोल्ड’

(Ambika Soni likely to be next Punjab CM after Amarinder Singh’s exit)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI