Ambil Odha : बिल्डरवर कारवाई करा, अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे जाणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Ambil Odha : बिल्डरवर कारवाई करा, अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे जाणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
प्रकाश आंबेडकर, नेते, वंचित बहुजन आघाडी

प्रकाश आंबेडकर यांनी स्थानिक रहिवाशांची भेट घेतली. संबंधित बिल्डरवर कारवाई करा, अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात आम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाणार असल्याचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी पुणे प्रशासना दिलाय.

अश्विनी सातव डोके

| Edited By: सागर जोशी

Jun 28, 2021 | 9:25 PM

पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील नागरिकांची अनेक घरं जमीनदोस्त केल्यानंतर वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. स्थानिकांच्या मदतीनं वंचित बहुजन आघाडीनं आज महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर संध्याकाळी प्रकाश आंबेडकर यांनी स्थानिक रहिवाशांची भेट घेतली. संबंधित बिल्डरवर कारवाई करा, अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात आम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाणार असल्याचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी पुणे प्रशासना दिलाय. (Prakash Ambedkar warns Pune administration against cracking down on Ambil stream)

महापालिका प्रशासनाने अतिक्रमण पाडण्याचा कुठलाही आदेश दिला नव्हता. पर्यावरण विभागाचं ना हरकत प्रमाणपत्रही घेण्यात आलं नव्हतं. जून, जुलैमध्ये कारवाई करु नये, असे कोर्टाचे आदेश असताना पोलिसांनी कारवाईला संरक्षण कसं दिलं? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. पावसाळ्यात कुणालाही बेघर करायचं नाही असे निर्देश असतानाही कारवाई झाली. कोण-कुणाच्या पाठीमागे आहे हे पाहता संबंधित बिल्डरवर कारवाई व्हावी. अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात आम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाणार असल्याचा इशाराही आंबेडकर यांनी दिलाय. गृहमंत्री यात काही कारवाई करतील असं वाटत नाही. त्यांच्याकडून तशी अपेक्षाही नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या विषयाची दखल घ्यावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केलीय.

सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत अजित पवारांविरोधात घोषणाबाजी

वंचित बहुजन आघाडीच्या सहाय्याने आंबिल ओढ्यातील नागरिकांनी महापालिकेच्या बाहेर ठिय्या दिला. पाडलेली घरं बांधून देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. वंचित बहुजन आघाडी आणि आंबिल ओढ्यातील महिला आंदोलनात सहभागी झाल्या. महापालिकेविरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलक महिलांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी खाली बसून आंदोलक महिलांसोबत सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. मात्र त्याचवेळी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोरच अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. “मुर्दाबाद मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद” अशा घोषणा चक्क सुप्रिया सुळे यांच्या समोरच दिल्या जात होत्या.

आंबिल ओढ्याचा वाद काय?

कात्रज तलावापासून आंबिल ओढ्याला सुरुवात होते. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे. ही जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. जागा बळकवण्यात लोकप्रतिनिधींचाही हात असल्याचाही आरोप केला जात आहे.

आंबिल ओढ्यामध्ये भर टाकून अनेक ठिकाणी बांधकामं करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा लगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरुन नुकसान होते. प्रशासनाकडून वारंवार नाले बुजवले जातात, पावसाचे पाणी नैसर्गिकपणे वाहून नेणारे ओहोळ बुजवले जात आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याची वहनक्षमता 60 टक्क्यांनी घटल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहोचतात, पुण्याचे महापौर निशाण्यावर, राष्ट्रवादीबद्दल सामना मवाळ?

आंबिल ओढ्यातील तोडक कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती, स्थानिकांना मोठा दिलासा

Prakash Ambedkar warns Pune administration against cracking down on Ambil stream

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें