अमित शाहांचं उत्पन्न किती?

गांधीनगर: भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी भव्य शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अमित शाह हे गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे दिल्लीतील बडे नेते उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यावेळी हजेरी लावली.  अमित शाह यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या …

अमित शाहांचं उत्पन्न किती?

गांधीनगर: भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी भव्य शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अमित शाह हे गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे दिल्लीतील बडे नेते उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यावेळी हजेरी लावली. 

अमित शाह यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती जाहीर केली. गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये 12 लाखांची वाढ झाल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. तर पत्नीच्या संपत्तीत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अमित शाह यांचं उत्पन्न  2013-14 मध्ये 41 लाख 93 हजार 218 रुपये होतं. त्यामध्ये केवळ 12 लाख रुपयांची वाढ होऊन ते 2017-18 मध्ये 53 लाख 90 हजार 970 रुपये इतकंच झालं.

दुसरीकडे अमित शाहांच्या पत्नीचं उत्पन्न 2013-14 मध्ये 14 लाख 55 हजार 637 रुपये होतं. ते 2017-18 पर्यंत तब्बल 2 कोटी 30 लाख 82 हजार 360 रुपयांवर पोहोचलं.

या दोघांच्या उत्पन्नातील तफावत म्हणजे, पाच वर्षात अमित शाहांचं उत्पन्न  केवळ 12 लाख रुपयांनी वाढलं. मात्र त्यांच्या पत्नीचं उत्पन्न थेट 2 कोटी 16 लाख रुपयांनी वाढलं.

अमित शाह यांचं उत्पन्न

  •  2013-14 – 41 लाख 93 हजार 218
  • 2017-18 – 53 लाख 90 हजार 970

उत्पन्नाचा स्त्रोत

अमित शाह यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचे स्त्रोत दाखवले आहेत. अमित शाह यांनी स्वत: सामाजिक कार्यकर्ते असल्याचं नमूद केलं आहे. शेती आणि बँकांमधली ठेवी, शेअर्स, म्युचल फंड यातून मिळणारे उत्पन्न हे आपला स्त्रोत म्हणून दाखवलं आहे.

पत्नी गृहिणी तरीही उत्पन्नात भरमसाठ वाढ

दुसरीकडे अमित शाह यांनी आपली पत्नी गृहिणी असल्याचं नमूद केलं आहे. मात्र पाच वर्षात त्यांची संपत्ती अनेक पटींनी वाढल्याचं प्रतिज्ञापत्रावरुन दिसतं. त्यांचं उत्पन्न 14 लाखांवरुन थेट 2 कोटींवर पोहोचलं आहे. त्यांनी आपला उत्पन्नाचा स्त्रोत शेअर्स, विविध ठिकाणचं भाडे आणि शेती हे दाखवलं आहे.

अमित शाह यांच्या विविध बँकामधील बचत ठेवी, मुदत ठेवी, रोख रक्कम, शेअर्स यांची मिळून जवळपास 18 कोटी 24 लाख रुपये होतात. यामध्ये घर, जमीन किंवा वाहनांचा समावेश नाही. त्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *