AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, मिटकरींचा भाजपवर घणाघात

शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, अशी टीका आमदार मिटकरींनी भाजपवर केली आहे.

शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, मिटकरींचा भाजपवर घणाघात
चंद्रकांत पाटील आणि अमोल मिटकरी
| Updated on: Jan 05, 2021 | 10:04 PM
Share

अकोला : महाराष्ट्रात सध्या शहराच्या नामांतरावरुन जोरदार गदारोळ सुरु आहे. नामांतरावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. यावरुनच राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर प्रहार केला आहे. शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, अशी टीका मिटकरींनी भाजपवर केली आहे. (Amol Mitkari Slam Chandrakant Patil over rename of City)

भाजपात खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं आव्हान मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

गुजरातची सत्ता किती काळ भाजपजवळ आहे?, एवढ्या दिवसात अहमदाबादच नाव का बदललं नाही?, असा सवाल करत भाजपात खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं मिटकरी म्हणाले.

1990 आणि 2001 मध्ये भाजपने घोषणा केली होती की आमची सत्ता आल्यावर अहमदाबाद शहराचं नाव बदलू… तिथं कित्येक वर्षे तुमचंच सरकार आहे, मग आजून अहमदाबादचं नाव कर्णावती का झालं नाही?, असं मिटकरी म्हणाले. तर भाजपच्या काळात कर्णावती झालं नाही तर गुजरातची सत्ता महाविकास आघाडीच्या हातात द्या, दुस-याच दिवशी कर्नावती नाव आम्ही करुन दाखवू, असंही मिटकरी म्हणाले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपचं राजकारण

महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीला टार्गेट करण्याच शडयंत्र भाजप रचत आहे, असा आरोप यावेळी मिटकरी यांनी केला. भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एवढीच जर धमक असेल तर त्यांनी अहमदाबादच्या नामांवराविषयी मोदींशी बोलावं, असं मिटकरी म्हणाले.

औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ येताच सेनेची नेहमीच माघार- फडणवीस

औरंगाबादचं नामांतर करण्यासाठी भाजपने 1995 पासून चार प्रस्ताव औरंगाबाद पालिकेत दिले होते. स्मरणपत्रेही दिले. पण शिवसेनेने त्याकडे दुर्लक्ष केलं, असं सांगतानाच जेव्हा जेव्हा औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा शिवसेनेने कच खाल्ली. त्यांची वृत्ती औरंगजेबासारखी दिसून आली, असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज केला होता. भाजपने औरंगाबाद पालिकेत चार वेळा नामांतराचा प्रस्ताव दिला आहे. पण शिवसेनेने हा प्रस्ताव दाखल करून घेतला नाही. तसेच बोर्डावरही हा प्रस्ताव आणला नाही, असा गंभीर आरोप करतानाच भाजपचे तत्कालीन नगरसेवक राजू शिंदे यांनी महापौरांना स्मरणपत्रं लिहिले असता वारंवार स्मरण पत्रं लिहू नये, असं महापौरांनी इतिवृत्तात म्हटल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. औरंगाबादच्या नामांतराचं शिवसेनेच्या मनात होतं तर प्रस्ताव पुढे का आला नाही? असा सवालही त्यांनी केला. (Amol Mitkari Slam Chandrakant Patil over rename of City)

हे ही वाचा

शिवसेना म्हणजे नौटंकी सेना, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.