माजी गृहमंत्री काय हनीमुनला गेले का? अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसंच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारलाय.

माजी गृहमंत्री काय हनीमुनला गेले का? अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल
अनिल देशमुख, अमृता फडणवीस
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 9:21 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसंच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारलाय. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून सुरु असलेल्या कारवाईचंही त्यांनी जोरदार समर्थन केलं आहे. (Amrita Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government on Anil Deshmukh and Parambir Singh case)

‘त्यांचं कुठे हनिमून चाललंय माहिती नाही’

‘एक पोलीस कमिश्नर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी घोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना’, अशा शब्दात देशमुख आणि सिंह यांच्या गायब होण्यावरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय.

ड्रग्स प्रकरणातील कारवाईचं जोरदार समर्थन

त्याचबरोबर ‘इथे लोक ड्रग्ज घेऊन फिरतात. कारण कोणी दिलंय, लोकांनीच दिलंय ना. यावर काम करावं की नाही करावं, महाराष्ट्र प्रगतीच्या दृष्टीनं पुढे जावा की ड्रग्स कॅपिटल बनावा हे आपल्यालाच ठरवायचं आहे. यंग जनरेशनला तुरुंगात टाकावं हा माझा वैयक्तिक विचार नाही. त्यांना सुधारणागृहाची जास्त गरज आहे. पण त्या आधी ते कुठून येतंय, त्याचं नेटवर्क काय आहे हे कळायला पाहिजे. ते कळल्यावर त्या मुलाला तुरुंगाची नाही, तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज असते’, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी एनसीबीच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.

विविध चौकशांवरुनही महाविकास आघाडीतील नेत्यांना उत्तर

केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर सुरु आहे. त्यावरुन महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत विचारलं असता, तुम्ही तशी कृती करता म्हणून आरोप होतो. तुम्ही जलयुक्त शिवार योजनेवर आरोप करता, मग तुमच्यावरही आरोप होणारच, असं प्रत्युत्तर त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिलं आहे.

..तर त्यांचं वसुली सरकार कसं चालेल?

त्याचबरोबर ‘सामना’तून होणाऱ्या टीकेलाही अमृता फडणवीस यांनी खोचक उत्तर दिलंय. ‘सामना’ टीका कुणावर करेल? जर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसवर टीका केली तर त्यांचं वसुली सरकार कसं चालेल? असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

इतर बातम्या :

Video : प्रियंका गांधींना मिळाली अपघाताची माहिती, जखमी महिलेला स्वत: केली मलमपट्टी

अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला! सरकारकडून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

Amrita Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government on Anil Deshmukh and Parambir Singh case

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.