Video : प्रियंका गांधींना मिळाली अपघाताची माहिती, जखमी महिलेला स्वत: केली मलमपट्टी

प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर तुटून पडल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर त्या आज आग्राकडे जात होत्या. त्यावेळी त्यांना एका अपघाताची माहिती मिळाली. प्रियंका गांधी यांनी आपला ताफा थांबवून अपघातातील जखमींना मदत केल्याचं पाहायला मिळालं.

Video : प्रियंका गांधींना मिळाली अपघाताची माहिती, जखमी महिलेला स्वत: केली मलमपट्टी
प्रियंका गांधी यांची जखमी तरुणीला मदत


नवी दिल्ली : पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) चांगलेच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर तुटून पडल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर त्या आज आग्राकडे जात होत्या. त्यावेळी त्यांना एका अपघाताची माहिती मिळाली. प्रियंका गांधी यांनी आपला ताफा थांबवून अपघातातील जखमींना मदत केल्याचं पाहायला मिळालं. (Priyanka Gandhi helps a young girl injured in an accident in Agra)

जगदीशपूरमध्ये एका सफाई कामगाराचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी आग्राकडे निघाल्या होत्या. या दरम्यान, त्यांना रस्त्यावर एका मुलीचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. प्रियंका गांधी यांनी आपला ताफा थांबवला आणि त्या स्वत: अपघातातील जखमी तरुणीच्या मदतीला धावल्या. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या गाडीतील फर्स्ट एड बॉक्स आणायला लावून स्वत: त्या तरुणीला मलमपट्टी केली. प्रियंका गांधी यांच्या या साधेपणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

आग्रा इथल्या जगदीशपूर भागात पोलीस कोठडीत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या व्यक्तीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी जात होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांनी यमुना एक्सप्रेस वे वर रोखलं आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. लखनौ पोलिसांनी कलम 144 आणि कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देत प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं आहे.

जगदीशपूरमध्ये सफाई कर्मचारी अरुण वाल्मिकी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई करत त्यांचं निलंबन करण्यात आलंय. त्यानंतर आज प्रियंका गांधी या मृत अरुणच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दिल्लीवरुन निघाल्या होत्या. त्यावेळी यमुना एक्सप्रेस वे च्या एन्ट्री पॉईन्टवर पोलिसांनी प्रियंका यांचा ताफा अडवला. पोलिसांनी प्रियंका यांनी परत जाण्याचं आवाहन केलं. मात्र, प्रियंका गांधी पुढे जाण्यावर ठाम राहिल्या. त्यानंतर पोलिसांनी अखेर प्रियंका यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार घोषणाबाजी केली.

इतर बातम्या :

अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला! सरकारकडून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

‘शिवसेनेच्या खासदारांनाच वाटतं की हे सरकार कधी पडतं’, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचा खळबळजनक दावा

Priyanka Gandhi helps a young girl injured in an accident in Agra

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI