अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं, ट्विटरवरुन खोचक शब्दात टीका

महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आदी नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि सरकारवर जोरदार टीका केलीय. आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं, ट्विटरवरुन खोचक शब्दात टीका
अमृता फडणवीस, उद्धव ठाकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावरुन महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आदी नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि सरकारवर जोरदार टीका केलीय. आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. ‘महाराष्ट्र वसूली सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त अपघाती आणि गैरहजर मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा’, अशा खोचक शब्दात अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

महा विश्वासघातकी आघाडी सरकार– जावडेकर

प्रकाश जावडेकर यांनी उद्धव ठाकरेंना अपघातानं झालेले मुख्यमंत्री म्हणत टीकास्त्र सोडलंय. राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली, पण केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली असा आरोपही प्रकाश जावडेकरांनी केला आहे. हे सरकार संधीसाधू सरकार असल्याचा घणाघात जावडेकरांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना जोरदार रंगू लागलाय. मी नवे नाव देतोय, महा विश्वासघातकी आघाडी सरकार, असं म्हणत जावडेकारांनी ठाकरे सरकारचं पुन्हा नव्यानं नामकरण केलंय. अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले, काही मंत्र्यांनी जावयाला कंत्राट दिलं, काही मंत्र्यांनी दाऊद शी संबंधित मालमत्ता घेतली, असं म्हणत नाव न घेता जावडेकर यांनी अनेक मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

दोन वर्षात महाराष्ट्र 20 वर्षे मागे गेला- दरेकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी म्हणाले जनतेनं आम्हाला आपलं मानलं. पण सरकारनं जनतेला आपलं मानलं नाही. 2 वर्षात राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही. यातून मार्ग काढू शकतं ते आमचं सरकार. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निश्चितपणे सरकार येणार. कधी येणार तेही आम्ही सांगणार नाही. थोडं गनिमी काव्यानं वागणार, असा सूचक इशारा दरेकर यांनी दिलाय.

इतर बातम्या : 

Omicron Variant : महाराष्ट्रातही ‘ओमिक्रॉन’चा धोका? दक्षिण आफ्रिकेवरुन डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह!

Omicron Variant : ‘लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील’, मुख्यमंत्र्यांचं आवाहन; प्रशासनाला महत्वाचे आदेश

Published On - 11:27 pm, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI