AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक पुन्हा एकदा चर्चेत; अपक्ष उमेदवाराचा खळबळजनक दावा

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक याना त्या कारणाने सतत चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा एका अपक्ष उमेदवाराने केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक चर्चेत आली आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक पुन्हा एकदा चर्चेत; अपक्ष उमेदवाराचा खळबळजनक दावा
| Updated on: Oct 20, 2022 | 1:24 PM
Share

मुंबई : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक याना त्या कारणाने सतत चर्चेत आहे. सुरुवातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्या राजीनाम्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. दोन्ही गटांकडून एकोंमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यानंतर भाजपाने (BJP) या निवडणुकीतून अचानक माघार घेतली. आता पुन्हा एकदा ही पोटनिवडणूक चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. या पोटनिवडणुकीसाठी उभा राहिलेल्या एका अपक्ष उमेदवाराने आपल्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. मिलिंद कांबळे (Milind Kamble) असं या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे.  पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी आपल्यावर वीस ते पंचवीस जणांच्या गटाने दबाव टाकल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.

कांबळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर

दरम्यान मिलिंद कांबळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर गेले होते. मात्र त्यांची अपॉईंटमेंट नसल्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटता आले नाही.

कांबळेंचा नेमका दावा काय?

मिलिंद कांबळे यांनी धक्कादायक दावा केला आहे.  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपण अपक्ष म्हणून उभे आहोत. 17 ऑक्टोबर 2022 ही निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. या दिवशी 20 ते 25 जणाच्या गटाने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा दावा कांबळे यांनी केला आहे. तसेच आपण उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. मात्र उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे आता तू मतदारसंघात प्रचार कसा करतो ते आम्ही पहातोच अशी धमकी दिल्याचा आरोपही कांबळे यांनी केला आहे.  अपक्ष उमेदवाराला निवडणूक लाढवता आली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.