मतदान केंद्राबाहेरच तुफान दगडफेक, दोघांचा मृत्यू, विधानसभा अध्यक्षावरही हल्ला

गुंटूर, आंध्र प्रदेश : दक्षिण भारतातील राज्य आंध्र प्रदेशमध्ये मतदानावेळी हिंसाचाराची घटना घडली आहे. आंध्रातील ताडीपत्री भागात मतदान केंद्राबाहेर वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला, ज्यात दोन जणांचा मृत्यू झालाय, तर तीन जण गंभीर जखमी आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायुडू यांचा पक्ष टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. यामध्ये टीडीपीचे […]

मतदान केंद्राबाहेरच तुफान दगडफेक, दोघांचा मृत्यू, विधानसभा अध्यक्षावरही हल्ला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

गुंटूर, आंध्र प्रदेश : दक्षिण भारतातील राज्य आंध्र प्रदेशमध्ये मतदानावेळी हिंसाचाराची घटना घडली आहे. आंध्रातील ताडीपत्री भागात मतदान केंद्राबाहेर वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला, ज्यात दोन जणांचा मृत्यू झालाय, तर तीन जण गंभीर जखमी आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायुडू यांचा पक्ष टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. यामध्ये टीडीपीचे कार्यकर्ते सिद्धा भास्कर आणि विरोधी पक्ष वायएसआरचे नेते गोपी रेड्डी यांचा या हिंसाचारात मृत्यू झालाय. दोन्हीही पक्षांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली, ज्यात तीन जण जखमी झाले.

वाएसआरकडून मतदान केंद्रावरील एजंटकडून मतदारांना आपल्या पक्षाला मतदान करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप चंद्राबाबूंनी केलाय. तर हाच आरोपही वायएसआरकडूनही टीडीपीवर करण्यात आलाय. हा आरोप करत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना रोखण्यासाठी मतदान केंद्रावर गेले आणि तिथेच हा प्रकार घडला.

आंध्रातील गुंटूर जिल्ह्यातही हिंसाचार झालाय. विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद यांच्यावर वायएसआरच्या कार्यकर्त्यांना हल्ला केल्याचा आरोप केला जातोय. शिवप्रसाद हे मतदारांना टीडीपीला मतदान करण्यासाठी दबाव टाकत होते, असा आरोप वायएसआरकडून करण्यात आलाय.

आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा आणि लोकसभेसाठी मतदान होत आहे. विधानसभेच्या 175 आणि लोकसभेच्या 25 जागांसाठी सुरु असलेल्या मतदान प्रक्रियेत काही ठिकाणी शांततेला गालबोटही लागलं.

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.