AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फरार घोषित होणं टाळण्यासाठी अनिल देशमुख ईडीसमोर प्रकटले’, चंद्रकांत पाटलांचा टोला

अनिल देशमुख यांनी केवळ चौकशी होणार की त्यांना अटक केली जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुखांवर जोरदार निशाणा साधलाय.

'फरार घोषित होणं टाळण्यासाठी अनिल देशमुख ईडीसमोर प्रकटले', चंद्रकांत पाटलांचा टोला
अनिल देशमुख, चंद्रकांत पाटील
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 1:28 PM
Share

पुणे : 100 कोटी वसुलीच्या आरोपामुळे पायउतार व्हावे लागलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी कार्यालयात दाखल झाले. सोमवारी सकाळीच ते ईडी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, अनिल देशमुख यांनी केवळ चौकशी होणार की त्यांना अटक केली जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुखांवर जोरदार निशाणा साधलाय. (Anil Deshmukh enters ED office to face interrogation, Chandrakant Patil criticizes Deshmukh)

अनिल देशमुख आता प्रकट झाले आहेत. ते आधी का आले नाहीत? आता ईडी ठरवेल काय कारवाई करायची. आता जर ते ईडीसमोर आले नसते तर त्यांना फरार घोषित करण्यात आलं असतं. ते टाळण्यासाठीच ते आज ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. अटक टाळण्यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले. मात्र, त्यांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असा टोला पाटील यांनी देशमुखांना लगावलाय.

अनिल देशमुखांचे ट्वीट

दरम्यान, अनिल देशमुख यांनी आज एक ट्विट करुन आपण ईडी कार्यालयात चौकशीसाठी जात असल्याचं ट्वीट दुपारी साडे बाराच्या सुमारास केलं होतं. ‘माननिय उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार आहे’, असं देशमुख आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप

अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयये वसुलीचा आरोप आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. देशमुख यांच्याच्या नागपूर आणि मुंबईतील घरांवर अनेकदा छापेमारी करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या नागपूर, मुंबईतील मालमत्तांवरही टाच आणण्यात आली आहे. ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी अनेक वेळा समन्स बजावले होते. मात्र, ते ईडीसमोर आले नव्हते. यंत्रणाही त्यांचा शोध घेत होती. मात्र, ते यंत्रणांनाही सापडले नाही. त्यामुळे देशमुख नक्की कुठे आहेत? असा सवाल केला जात होता. तसेच देशमुख परदेशात पळून गेल्याचीही चर्चा होती. मात्र, आज अचानक देशमुख ईडी कार्यालयात आवतरले. त्यामुळे त्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं जातं.

माजी पोलिस आयुक्तांचे देशमुखांवर गंभीर आरोप

देशमुखांवर ते गृहमंत्री असताना मुंबईचे तत्काली पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच आरोप केले होते. सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रं लिहून देशमुख यांच्या वसुलीची पोलखोल केली होती. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल.

देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.

इतर बातम्या :

‘फडणवीसांना या प्रकरणात ओढण्याचे परिणाम भोगावे लागणार’, चंद्रकांत पाटलांचा मलिकांना निर्वाणीचा इशारा

देवेंद्र फडणवीसांवर मलिकांचा गंभीर आरोप, पंकजा मुंडे म्हणतात, ‘हे अत्यंत हास्यास्पद’

Anil Deshmukh enters ED office to face interrogation, Chandrakant Patil criticizes Deshmukh

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.