Uddhav Thackeray : नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, सहसंपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांचा राजीनामा; शिंदे गटात सामील होणार!

शिवसेनेमध्ये (Shiv Sena) सुरू असलेली गळती अजूनही सुरूच आहे. आता नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.  शिवसेनेचे नागपूर सहसंपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Uddhav Thackeray : नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, सहसंपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांचा राजीनामा; शिंदे गटात सामील होणार!
अजय देशपांडे

|

Aug 18, 2022 | 7:49 AM

नागपूर:  शिवसेनेमध्ये (Shiv Sena) सुरू असलेली गळती अजूनही सुरूच आहे. आता नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.  शिवसेनेचे नागपूर सहसंपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेश काशीकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मंगेश काशीकर यांनी शिंदे गटाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय किरण पांडव यांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेश काशीकर (Mangesh Kashikar) यांनी राजीनामा दिल्यानंतर ते आता शिंदे गटात सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. किरण पांडव यांच्यामार्फत काशिकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसेनेमध्ये सुरू असलेली गळती थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे शिवसेनेमधून एकनाथ शिंदे गटात सामील होणाऱ्यांची संख्या वाढतच आहेत. खासदार तुमाने, आमदार जैस्वाल, जिल्हाप्रमुख ईटकीलवार यांच्यानंतर मंगेश काशीकर आता शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

पांडव यांच्या भेटीनंतर राजीनामा

मंगेश काशीकर यांनी आधी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेल्या किरण पांडव यांची भेट घेतली. या भेटीनंतर काशीकर यांनी शिवसेनेच्या नागपूर सहसंपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर मंगेश काशीकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ते किरण पांडव यांच्यामार्फत शिंदे गटात सहभागी होणार आहेत. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विदर्भातील अनेक बडे नेते शिंदे गटात सामील होत आहेत. खासदार तुमाने, आमदार जैस्वाल, जिल्हाप्रमुख ईटकीलवार यांच्यानंतर आता मंगेश काशीकर हे देखील शिंदे गटाच्या वाटेवर आहे. यामळे विदर्भात शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या गळतीचा फटका शिवसेनेला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि इतर निवडणुकीत बसू शकतो.

हे सुद्धा वाचा

गळती थांबवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात

दरम्यान दुसरीकडे शिवसेना लवकरच कमबॅक करेल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून,  त्यांनी सभांचा धडका लावला आहे. यामाध्यमातून शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. मात्र तरी देखील गळती सुरूच असल्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसत  आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें