AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा समाजाची माफी मागा, अन्यथा मराठवाड्यात फिरू देणार नाही; राऊतांना मराठा आंदोलकांचा इशारा

खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी “जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करण्यासारखी स्थिती नाही”, असा टोला लगावला होता. त्यावर आता मराठा क्रांती मोर्चाने प्रत्युत्तर दिले आहे.

मराठा समाजाची माफी मागा, अन्यथा मराठवाड्यात फिरू देणार नाही; राऊतांना मराठा आंदोलकांचा इशारा
| Updated on: Oct 12, 2020 | 7:22 PM
Share

जालना : खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी “जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करण्यासारखी स्थिती नाही”, असा टोला लगावला होता, त्यावरून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (Apologize to Maratha community, otherwise they will not allow you to roam in Marathwada, Maratha Kranti Morcha warns Sanjay Raut)

“संजय राऊत तुम्हाला एकच इशारा आहे, दरवेळी तुम्ही ‘सामना’च्या अग्रलेखातून आमच्या समाजाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना टार्गेट करता, आम्ही हे खपवून घेणार नाही. तुम्ही ताबडतोब माफी मागा. जर माफी न मागता तुम्ही मराठवाड्यात आलात तर मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही”, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पंकज जऱ्हाड यांनी दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षणाबाबत बोलताना म्हणाले होते की, ‘एक राजे बिनडोक आहेत, तर दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून वेगळेच काहीतरी चालले आहे. याबाबत सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही.

यावरुन आता मराठा क्रांती मोर्चा, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे भोसले यांचे चाहते संतप्त झाले असून अनेक जण संजय राऊतांना प्रत्युत्तर देत आहेत.

अग्रलेखात काय म्हटलं आहे?

अग्रलेखात म्हटले आहे की, “मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोजगार देणारा प्रत्येक व्यवसाय पुढचे सहा महिने चालू राहील, याची काळजी घेतलीच पाहिजे. कायद्याचे पालन कोण किती करतो, यावर बोलायचे म्हटले तर अनेकांचे वस्त्रहरण होईल. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल. तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसे सांगावे. पांढरपेशे लोक पोटापाण्यासाठी गुन्हेगारीकडे वळत आहेत, ही धोक्याची घंटा सरकारच्या कानावर गेली तरी पुरे! असेही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे”.

“जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. आता दसराही येत आहे. त्यामुळे शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पाहावेच लागेल. राज्याचे प्रश्न वेगळे आहेत. त्यावर कोणी गांभीर्याने बोलायला तयार नाही”.

संबंधित बातम्या

जिभेची तलवारबाजी लोक फार काळ सहन करणार नाही, शिवसेनेचा इशारा

आम्ही फक्त तीनच राजेंना मानतो, पहिले सम्राट अशोक : प्रकाश आंबेडकर

बीड जिल्ह्याचा विकास निधी बारामतीला गेलाच कसा?; खासदार प्रीतम मुंडे यांचा सवाल

(Apologize to Maratha community, otherwise they will not allow you to roam in Marathwada, Maratha Kranti Morcha warns Sanjay Raut)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.